Ladki Bahin Yojana : जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट अन् तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana July installment date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या ₹1500 हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हप्ता कधी जमा होणार, पात्र महिलांना ₹3000 मिळणार का, e-KYC, पुनर्पडताळणी आणि नवीन अपडेट जाणून घ्या.
Ladki Bahin Yojana July installment payment update
Women await the July ₹1,500 Ladki Bahin Scheme installment in Maharashtra.meata ai
Published On

Ladki Bahin Yojana, July Installment, ₹1500 Payment : जुलै महिना संपण्यासाठी आता अवघे चार दिवस उरले आहेत, मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या (July Installment Date) १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो पात्र महिला या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (Maharashtra Ladki Bahin payment latest update)

जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला होता. परंतु, जुलैचा महिना संपत आला तरी पैसे न (When will Ladki Bahin ₹1500 be credited) आल्यामुळे महिलांच्या मनात उत्सुकता आणि शंका निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयामुळे या योजनेचा हप्ता लांबणीवर पडणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. (July installment expected date Maharashtra)

Ladki Bahin Yojana July installment payment update
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर, ८० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र; तुमचं नाव यादीत आहे का?

हप्ता कधी जमा होणार?

सूत्रानुसार, जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतचा अंतिम निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर १० ते १५ ऑगस्टदरम्यान पात्र बहिणींच्या खात्यावर जुलैचे १५०० रुपये जमा होऊ शकतात.

ज्या महिला पात्र असूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळू शकला नव्हता, त्यांच्या खात्यात जुलै आणि जून असे दोन्ही मिळून ३००० रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana July installment payment update
Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

८० लाखांहून अधिक महिला अपात्र; १.७० कोटी महिलांना लाभ

ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर योजनेच्या निकषात न बसणाऱ्या ८० लाखांहून अधिक महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता सुमारे १ कोटी ७० लाख पात्र महिलांनाच या योजनेचा दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana July installment payment update
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

केवायसी करूनही पैसे न मिळणाऱ्यांसाठी दिलासा

ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्या पात्रही आहेत, तरीही त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत, अशा अनेक तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा अर्जांची सध्या पुनर्रपडताळणी (Re-verification) केली जात आहे. या पडताळणीत अर्ज योग्य आढळल्यास त्या सर्व महिलांच्या खात्यात थकीत पैशांसह लाभाची रक्कम लवकरच जमा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com