Corona News: कोरोनाचा धोका टळला? राज्यातील दिलासादायक आकडेवारी आली समोर

Maharashtra Covid Update : नववर्षाची सुरुवात सकारात्मक होताना दिसतेय. मागील आठवड्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं समोर येतंय. महाराष्ट्रात सध्या ८९१ सक्रिय रुग्ण आहेत.
Covid file photo
Covid file photo Saam Tv
Published On

Corona Patients in Maharashtra

मागील काही दिवसांपासून कोरोना महामारीनं हैराण केलंय. पण आता राज्यात कोरोनाबाबत दिलासादायक माहिती समोर येतेय. महाराष्ट्रात नवीन कोविड रुग्णांच्या साप्ताहिक संख्येत किरकोळ घट दिसून आलीय. मागील आठवड्याच्या तुलनेत १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या माफक प्रमाणात वाढून ८९५ वर पोहोचली आहे. (latest covid update)

महाराष्ट्रात सध्या ८९१ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी ४.५ टक्के रुग्णालयात दाखल आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यांची संख्या ४०३ आहे. त्यानंतर पुणे मंडळाचा क्रमांक (Corona) लागतो.

मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण

रविवारपर्यंत ४१ रुग्ण रुग्णालयात दाखल होते. त्यापैकी २९ वॉर्डमध्ये आणि १२ आयसीयूमध्ये होते. महाराष्ट्रात आतापर्यंत JN.१ या विषाणूची १३९ रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पुणे मंडळाचा क्रमांक लागतो. शहरांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये सर्वाधिक सक्रिय प्रकरणे (maharashtra) आहेत.

रुग्णसंख्येच्या आलेखात वाढ होत नसल्याचं राज्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय. रविवारी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

Covid file photo
Aastad Kale Mother Death: ...म्हणुनी घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून, आईच्या निधनानंतर आस्ताद काळेची भावुक पोस्ट

वर्षअखेरीच्या उत्सवामुळे गर्दी झाली होती. त्यामुळं कोरोना रुग्णांमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्येत वाढ होवू शकते, असा अंदाज राज्य अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. रविवारी महाराष्ट्रात १११ नवीन संसर्गाची नोंद झालीय. एकूण १० हजार ४१५ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यांचा दैनिक सकारात्मकता दर १.०६ टक्के आहे.

कोरोना आता एक स्थानिक आजार झालाय. JN.१ वेगाने पसरत आहे, परंतु त्याचं संक्रमण कमी प्रमाणात होतंय, असं राज्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Covid file photo
Apoorva Shukla Death: डिप्रेशनमुळे 35 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू, अजय देवगण-बिग बींसोबत केलंय काम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com