Aastad Kale Mother Death: ...म्हणुनी घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून, आईच्या निधनानंतर आस्ताद काळेची भावुक पोस्ट

Aastad Kale Mother Sunita Kale Died: आईच्या अचानक निधनामुळे (Aastad Kale Mother Death) आस्ताद काळेला मोठा धक्का बसला आहे. दु:खात असेलेल्या आस्ताद काळेने फेसबुकवर भावुक पोस्ट केली आहे. आस्तादची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Aastad Kale Mother Sunita Kale Died
Aastad Kale Mother Sunita Kale DiedSaam Tv
Published On

Marathi Actor Aastad Kale:

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळेच्या (Aastad Kale) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आस्ताद काळेला मातृश्लोक झाला आहे. आस्तादची आई सुनीता काळे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आईच्या अचानक निधनामुळे (Aastad Kale Mother Death) आस्ताद काळेला मोठा धक्का बसला आहे. दु:खात असेलेल्या आस्ताद काळेने फेसबुकवर भावुक पोस्ट केली आहे. आस्तादची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

आस्ताद काळेने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर आईच्या निधनानंतर काही पोस्ट केल्या आहेत. आस्तादच्या या भावुक पोस्टने सध्या सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. आईच्या निधनानंतर आस्तादने दोन पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये आस्तादने लिहिले की, 'ती गेली... तेव्हा...' आस्तादने आणखी एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, '...म्हणुनी... घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून.'

आई हे जग सोडून गेली आहे असं अजूनही आस्तादला वाटत नाहीये. आईच्या आठवणीमुळे त्याने केलेल्या या भावुक पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स करत सुनिता काळे यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आस्तादच नाही तर त्याचे बाबा प्रमोद काळे हे देखील पत्नीच्या निधनामुळे खूपच भावुक झाले आहेत. त्यांनी देखील फेसबुकवर पत्नीच्या आवणीमध्ये भावुक पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'GOODBYE MY DEAREST पुन्हा कधीतरी नक्की भेटू. तेव्हा राहिलेलं सगळं बोलू.' आस्तादच्या बाबांनी या पोस्टमध्ये सुनिता काळे यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

आस्ताद काळेचे त्याच्या आईवर खूपच प्रेम होतं. त्यांचं नातं खूपच खास होतं. महत्वाचे म्हणजे आस्ताद नेहमी आपल्या नावापुढे आईचे नाव अभिमानाने लावतो. त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर देखील त्याने आपले नाव 'आस्ताद सुनीता प्रमोद काळे' असे ठेवले आहे. आस्ताद नेहमी आपल्या सोशल मीडियावर आई-बाबांसोबतचे फोटो शेअर करताना दिसला आहे. अशातच आई असं अचानक सोडून गेल्यामुळे आस्ताद खूपच दु:खात गेला आहे. दरम्यान, आस्ताद काळेने मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Aastad Kale Mother Sunita Kale Died
Vijay Thalapathy: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला थलापती विजय, स्वत:च्या हाताने वाटलं अन्नधान्य; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com