Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

kailas fate Car Accident News : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कैलास फाटे यांच्या कारला बुलढाण्यातील खामगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर भरधाव ट्रकने धडक दिली. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
kailas fate Car Accident News
kailas fate Car Accident News Saam
Published On: 

Congress Leader kailas fate Car Accident News : विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेत्याच्या कारचा खामगावजवळ भीषण अपघात झाला आहे. मुंबई नागपूर महामार्गावर कैलास फाटे यांच्या कारला भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. कैलास फाटे यांनाही किरकोळ दुखापत झाली असून सध्या ते सुरक्षित असल्याची माहिती आहे. पण काँग्रेसने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.

kailas fate Car Accident News
Ladki Bahin Yojana: दिवाळीत होणार डबल धमाका? लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० जमा होणार?

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ मुंबई नागपूर महामार्गावर कैलास फाटे यांच्या कारचा अपघात झाला. ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून कैलास फाटे यांना किरकोळ दुखापत झाली. ते थोडक्यात बचावले. बुलढाणा काँग्रेसकडून हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केलाय.

kailas fate Car Accident News
Actress Death : आलियासोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं अचानक निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

कैलास फाटे हे सध्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करत आहेत. कैलास फाटे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या कारला महामार्गावर ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे विदर्भात खळबळ उडाली आहे. अपघातात कैलास फाटे यांच्या कारचा पूर्णपणे चुराडा झाला असून या अपघातात फाटे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

कैलास फाटे कारने मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. कार खामगावजवळ आल्यानंतर भरधाव ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. कारची अवस्था पाहता हा अपघात नसून प्राणघातक हल्ला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com