Maharashtra Cabinet : सांगली, लातूर अन् पुण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, निवडणुकीआधी कोट्यवधी रूपये मंजूर

Maharashtra rural development decision latest updates सांगली, लातूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी पंचायत समिती कार्यालयांच्या बांधकामासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर. फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.
Maharashtra Cabinet Decision
Maharashtra Cabinet Decisionx
Published On

Maharashtra government approves Sangli Latur Pune panchayat buildings : देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगली, लातूर आणि पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या कार्यालयासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. यामध्ये तीन जिल्ह्यातील पंचायत समितीच्या कार्यालयासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आलेला आहे. (Devendra Fadnavis cabinet sanctions fund for rural office infrastructure)

सांगलीतील जत, लातूर जिल्ह्यातील औसा आणि पुण्यातील दौंडला आता नवीन आणि अद्यावत पंचायत समिती कार्यालय मिळणार आहे. तीन तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तिन्ही नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास जवळपास ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुन्या झालेल्या इमारतींच्या पुर्नबांधणीसंदर्भात ग्रामविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांना मंजुरी देण्याचा सरकारकडून सपाटा लावला आहे.

Maharashtra Cabinet Decision
Cyclone Alert: महाराष्ट्रावर 'मोंथा' चक्रीवादळाचं संकट, पुण्यासह राज्यात धो धो कोसळणार,IMD चा मुसळधार पावसाचा अंदाज

जतसाठी लाखोंचा खर्च?

पंचायत समिती, जत येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या रूपये १४,५६,००,०००/- (रूपये चौदा कोटी छप्पन्न लक्ष फक्त) इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांस पुढील अटींच्या अधीन राहून या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. तथापि, अद्ययावत दरसूचीवर आधारित सविस्तर अंदाजपत्रकास संबंधित मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील.

Maharashtra Cabinet Decision
Earthquake : इमारती कोसळल्या, लाईट गेली; जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ; भूकंपामुळे ६.१ रिश्टर स्केलचे हादरे

दौंडसाठी किती रक्कम ?

पंचायत समिती, दौंड येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या रू.१३१९.०९ लक्ष इतक्या किंमतीचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. अद्ययावत दरसूचीवर आधारित सविस्तर अंदाजपत्रकास संबंधित मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील. प्रस्तुत बांधकामास तांत्रिक मान्यता देण्यापुर्वी संकल्पन तपासून घेणे आवश्यक राहील. प्रस्तुत इमारतीचे बांधकाम मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, सा. बां. मंडळ, मुंबई यांच्याकडील विहित नमुना आराखड्यानुसार हाती घेण्यापूर्वी स्थानिक नगररचना प्राधिकरणाची तसचे अग्निशमन यंत्रणेची मंजुरी घेणे बंधनकारक राहील.

Maharashtra Cabinet Decision
Cyclone Alert: महाराष्ट्रावर 'मोंथा' चक्रीवादळाचं संकट, पुण्यासह राज्यात धो धो कोसळणार,IMD चा मुसळधार पावसाचा अंदाज

लातूरसाठी किती रूपये ?

पंचायत समिती औसामधील नविन प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी रुपये ३,३४,२०,०००/- इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांस पुढील अटींच्या अधीन राहून या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत बांधकामास तांत्रिक मान्यता देण्यापुर्वी संकल्पन तपासून घेणे आवश्यक राहील.

Maharashtra Cabinet Decision
Phaltan Doctor Case: पुरावे नष्ट करून सरेंडर, SIT मार्फत चौकशी करा, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गावकरी रस्त्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com