राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. आजच्या कामकाजात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा खरा मास्टरमाईंड कोण? याचा शोध घ्या, असे म्हणत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणीही आशिष शेलार यांनी केली. जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
"मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणार एकमतानं आरक्षण दिलं. आरक्षण देत असताना जरांगेंनी कुणबी दाखले मिळत नसल्याची मागण केली. त्यानंतर सरकारने यंत्रणा कामाला लागून नोंदी शोधून काढल्या. जरांगेंनी दुसरी मागणी सरसकट मागणी केली. तरी आम्ही मराठा समाजाला आरक्षणाला १० टक्के आरक्षण दिलं. सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी निदर्शनास आणल्या त्या पूर्ण केल्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षणापासून का वंचित ठेवलं? याच मराठा समाजावर अनेक नेते मोठे झाले. माझी भूमिका प्रामाणिक आहे जे बोलतो ते करतो. ओबीसीला धक्का न लावता मराठा समजाला टिकणारं आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं. मात्र तत्कालिन सरकारने पुरावे न दिल्याने ते आरक्षण टिकलं नाही. मराठा समजाला आरक्षण सर्वानुमते दिलं मग ते का टिकणार नाही, काही कारणे आहेत का?" असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थित केला.
कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही..
"दगडफेकीचं समर्थन सरकार करणार नाही. आमदारांची घरं जाळली कुटुंब घरत असताना, मग सरकारन हातावर हात धरून बसायचं नाही. माझ्यावरही जरांगे बोलले नसेल जरी बोलले तरी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. मनोज जरांगे पाटील मग कसे असे बोलले? महाराष्ट्राला वेगळी संस्कती आहे. मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही कुठली भाषा? एका मर्यदेपर्यंत सहन केलं जाईल, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.