पराग ढोबळे | नागपूर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता भाजप नेते देखील आक्रमक झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नौटंकी बंद करावी, असं भाजप नेते म्हणत आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांची स्थिती गुजरातच्या हार्दिक पटेल (Hardik Patel) केविलवाणी होईल, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली आहे.
मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर सर्व मराठा समाजाचं हित होत असताना मनोज जरांगे पाटील यांची राजकीय महत्त्वकांशा जागृत झाली आहे. त्यामुळे ते मराठा समाजाला हाताशी धरुन आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबबात अपशब्द वापरले ते मराठा समाज आणि राज्यातील जनतेला आवडलेलं नाही. काही नौटंकी करुन सागर बंगल्यावर जाण्याचा हट्ट ते करत होते, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वांना माहित आहे की जरांगेंना ॲापरेट करणारा नेता कोण आहे? हे माहित आहे. त्यामुळे जरांगे फडणवीसांबद्दल असं बोलत आहे. राजकीय महत्त्वकांशा जरांगे पाटील यांना असेल तर त्यांची स्थिती गुजरातच्या हार्दिक पटेलसारखी केविलवाणी होईल, असंही आशिष देशमुख यांनी म्हटलं.
राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा पक्ष संपलाय. त्यामुळे ते सातत्याने जरांगे पाटील यांना ॲापरेट करत आहेत. जरांगे पाटील राजकीय व्यक्ती आहे. यापूर्वी ते विविध राजकीय पक्षाच्या स्टेजवर बसले होते. मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेत, स्वत:चं राजकारण करत आहेत, असंही आशिष देशमुख यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. ५० वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी होती, ती मागणी फडणवीस यांनी पूर्ण केली. शरद पवार जरांगे पाटील यांना ॲापरेट करत आहे, अशी टीकाही आशिष देशमुख यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.