Latur News: ऑन ड्यूटी पोलीस वाहनचालकाचा भीषण अपघात ; ट्रक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू

Latur Accident News: लातूरच्या औसा पोलीस ठाण्याच्या पोलीस ठाण्याच्या वाहन चालकाचं अपघाती निधन झालं आहे. चालक युवराज दिपील पांचाळ, असं या चालकाचे नाव आहे.
Latur News
Latur NewsSaam Digital
Published On

Accident of On Duty Police Driver

लातूरच्या औसा पोलीस ठाण्याच्या पोलीस ठाण्याच्या वाहन चालकाचं अपघाती निधन झालं आहे. चालक युवराज दिपील पांचाळ, असं या चालकाचे नाव आहे. चालकासह गाडीत असलेले पोलीस कर्मचारी मोतीराम घुले आणि होमगार्ड धीरज मुंजाळ यांनाही गंभीर दुखापत झाली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Latur News
Maharashtra Politics: लोकसभेसाठी शिंदे गटाचं ठरलं, ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार; भाजपचं टेन्शन वाढणार?

नेहमीप्रमाणे लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यातील कर्मचारी सेवेत हजर झाले होते. सोमवारी (ता. २६ फेब्रुवारी) रात्री रोजी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगवर होते. तेव्हा त्यांच्या गाडीची महामार्गावर असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत गाडी चालक युवराज दिलीप पांचाळ हे गंभीर जखमी झाले.

गाडीत असलेले पोलीस कर्मचारी मोतीराम घुले आणि होमगार्ड धीरज मुंजाळ यांनाही गंभीर दुखापत झाली. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. हा अपघात २६ फेब्रुवारीच्या रात्री झाला आहे.

अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वाहन चालक युवराज दिलीप पांचाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमी रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. वाहन चालक युवराज दिलीप पांचाळ यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

Latur News
Maharashtra Politics: 'नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला पराभूत केलं, याचं दु:ख', केसरकर असं का म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com