सचिन कदम
रायगड : मराठा आरक्षणाची मागणी शासनाने मेनी केली आहे. काही त्रुटी असल्यास त्या देखील दूर केल्या जातील. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन करावे मात्र शासन, मंत्री व मुख्यमंत्री याच्याविषयी संयमाने बोलाव; असा सल्ला (Raigad) रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनावर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी माध्यमांशी संवाद साधताना वक्तव्य केले आहे. महायुती सरकारने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देत अनेक वर्षांची मराठा समाजाची मागणी पूर्ण केली आहे. जरांगे पाटील यांनी ज्या कारणासाठी आंदोलन केल, ती मागणी विषेश अधिवेशन घेऊन पूर्ण झाली आहे. अजुनही काही त्रुटी असतील तर ते सरकारसोबत चर्चा करू शकतात. त्यांनी सरकारकडे चर्चेतुन मार्ग काढावा आणि कुठल्याही स्वरूपाचा तणाव निर्माण होणार नाही, यासाठी सहकार्य करावे अशी विनंती खासदार तटकरे यांनी जरांगे पाटील यांना केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ओबीसीतुन आरक्षणाची मागणी मराठा समाजाची कधीच नव्हती
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असताना ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण मिळाव, ही मागणी सकल मराठा समाजाची कधीच नव्हती; असा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी लोकशाही आघाडी सरकार आणि आत्ताच्या सरकारच्या काळात सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची आठवण करून दिली. सरकार आणि मराठा समाज संघटना यांची सुरुवातीपासून स्वतंत्रपणाच आरक्षण मिळाव अशी मागणी होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.