चेंबूर येथील पीएल लोखंडे मार्गावरीलसरस्वती चाळीतील एका घराचा स्लॅब कोसळून दीड वर्षीय मुलीचा मृत्यू तर तिची आई जखमी झाल्याची घटना घडली आहे.खुशी विनोद साळवे असे मृत्यू मुलीचे नांव आहे. चेंबूर येथील पीएल लोखंडे मार्गावरील एकता मित्र मंडळ जवळील स्वरस्वती चाळीत एका दुमजली घराचा स्लॅब अँगल सह कोसळलयाचा मोठा आवाज येताच रहिवाशांनी घराकडे धाव घेत आई आणि मुलीला बाहेर काढले पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृत्यू बालिका व जखमी कविता साळवे यांना उपचाराकरिता राजावाडी रुग्णालयात दाखल केले. उपचारदरम्यान बालिकाचा मृत्यू झाला तर जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.
चीन, पाकिस्तान आणि आखाती देशांतून येणारे फोन लोकल नंबरवर पाठवत कोंढवा येथील बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटर गेल्या आठ महिन्यांपासून सुरू होते. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेले हे सेंटर तिघेजण चालवत होते. त्यातील दोन आरोपी आठवी पास तर एक उच्चशिक्षित आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला आहे.
पहिल्या यादीत ६७ उमेदवारांची नाव जाहीर आहेत. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा मतदारसंघातून मैदानात उतरण्यात आलेत. अंबाला कॅंटहून अनिल वीज यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर कालका मतदारसंघातून शक्ती राणी शर्मा यांनाही उमेदवारी मिळालीय.
आज दिवसभरात ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 94 आगार पुर्णतः बंद होते. 92 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 65 आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.
लातूरच्या निलंगा तालुक्यातील कासार-शिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 34 वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी आता कासार-शिरसी पोलीस ठाण्यात एका अंदाजे 35 वर्षीय आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..मात्र आरोपी फरार असल्याने,आरोपीच्या शोधासाठी पोलीसांचे पथके रवाना झाले, असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणी दहा आरोपींना 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. काल रायगड जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणाहून पुणे पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली होती. आज त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या १० आरोपींना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भंडारदरा धरणाचे नामांतर विर राघोजी भांगरे जलाशय नामांतराला शासनाची मंजुरी
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचे नाव बदलले.
महायुती सरकारचा निर्णय
आद्य क्रांतिकारक विर राघोजी भांगरे जलाशय नामकरणाला मंजुरी
विल्सन डॅम झाला विर राघोजी भांगरे जलाशय
जलसंपदा विभागाची माहिती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. धावपट्टीबरोबरच विमानतळाची रडार यंत्रणा आणि इतर सुरक्षेच्या यंत्रणांच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यात विमानतळ धावपट्टीपासून काही अंतरावरून वैमानिकाला धावपट्टीची अचूक माहिती व्यवस्थित मिळते का या चाचण्या घेण्यात येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर महिन्यात हवाई दलाच्या सुखोई विमानाचे पहिल्यांदा उड्डाण होणार असल्याची माहिती समोर येतेय. विमानतळ प्रकल्पाची इतर कामे अंतिम टप्यात आहे. मार्च २०२५ ला या विमानतळाचा पहिला टप्पा मालवाहू वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर शहर आणि ग्रामीण कार्यकर्त्यांचा मेळावा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात झाली आहे. शासकीय विश्रामगृह येथे सुरू असणाऱ्या मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
भाजप महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांचे अनिल देशमुखांना प्रत्युत्तर 'पापं करायची आणि आमचे नाव घ्यायचे हा पायंडा पडला आहे. निवडणूकीत दोन हात होऊनच जाऊ द्या, असं चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना खुले आव्हान दिलं आहे.
मनोज जारंगे पाटील यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथे मनोज जरांगे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट कृषीमंत्र्यांना फोन लावून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अशी मागणी केली.
मावळमधील वडगाव येथील सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठाबाबत मनसेने संताप मोर्चा काढला आहे. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. .
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी गुजरात भाजपची स्पेशल टीम आहे. गुजरातमधील भाजप आजी माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांची स्पेशल टीम नाशिकमध्ये दाखल झालीय. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर भाजपचं विशेष लक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासातील गुजरातचे आमदार आणि कार्यकर्ते सक्रिय झालेत.
पुण्यातील वडगाव शेरी या ठिकाणी भाजपची बैठक सुरू आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत वडगाव शेरी मतदार संघाची बैठक पार पडतेय. जगदीश मुळीक यांना उमेदवारी न दिल्यास आम्ही अजित पवार गटाच्या उमेदवाराचे काम करणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतलीय.
सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे तब्बल 30 अर्ज भरले होते.या प्रकरणाचा पोलिस आता कसून तपास करत आहेत.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन व्यक्तींना अटक केलेली आहे अटक केलेल्या व्यक्ती या पती-पत्नी असून या गुन्ह्या बाबत पोलीस आता त्यांची चौकशी करत आहेत.हा प्रकार नेमका काय आहे याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी माहिती दिली.
मराठा समाजाचे काही कार्यकर्ते काँग्रेसच्या काँग्रेस भवन येथील विभागीय बैठकीच्या बाहेर आले आहेत. मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी हे मागणी करणार आहेत. हे विचारण्यासाठी काही मराठा कार्यकर्ते आले आहेत. काँग्रेस भवनाबाहेर गोंधळ होण्याची शक्यता आहे.
उदगीर येथील राष्ट्रपतीच्या कार्यक्रमास्थळी तीन महिलांना करंट बसला आहे. यामधील एक जण गंभीर तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.
- विधानसभा निवडणुकीच्या आधीच महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस
- छगन भुजबळ यांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार
- भाजपच्या नेत्या अमृता पवार आक्रमक
- जिल्ह्यातील निधीवर भुजबळांची मक्तेदारी आहे का? अमृता पवार यांचा हल्लाबोल
पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे.
अंधेरीकडून विरारकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहणांच्या रांगा लागल्या आहेत.
सागर चव्हाण याला मारण्यासाठी आरोपींनी एक अनोखा मास्टर प्लॅन तयार केला होता .
गेल्या दोन महिन्यांपूर्वी आरोपींनी सोशल मीडियावर एका मुलीच्या नावाने अकाउंट तयार केले होते.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर असल्याच आढळून आलय... गंगापूर रोड परिसरातील बापू पुलाकडून मखमलाबादकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नागरी वसाहतीत बिबट्या दिसून आलाय... पहाटेच्या सुमारास देखील बिबट्याने मळ्यातील पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडलीय... दरम्यान कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय... मानवी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबतची माहिती नागरिकांकडून वन विभागालाही कळविण्यात आलीय.. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात मांजर ठेवल्याने बिबट्या येईल कसा ? असा संतप्त सवाल देखील आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागलाय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. आज दुपारी बारापर्यंत एसटीच्या राज्यभरातील 251 आगारापैकी 96 आगार पूर्णतः बंद आहेत. 82 आगार अंशतः सुरू आहेत. तर 73 आगारातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. लाखो रुपायंचा यामुळे फटका बसला आहे.
CCTV Video : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सकाळी कोयत्याने तरुणावर हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आलाय.
Marathi News : भाजपचे राज्यसभेचे नवनियुक्त खासदार धैर्यशील पाटील यांनी घेतली खासदाराची शपथ. राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांनी शपथ दिली
वडेट्टीवार काय म्हणतील यावर आमची युती अवलंबून नाहीय.वडेट्टीवार याचं लोक आयकणार नाहीत.घोडा मैदान समोर आहे.त्यावेळी समजेल कोणाच्या किती जागा येतील.परंतु महायुयी आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत.मोठ्या संख्येने आमच्या जागा येतील अशा विश्वास ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.शिंदे मुख्यमंत्री आहेत,आमचे नेते आहेत.आम्ही शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही राज्यात निवडणुका लढवणार आहोत.जागा वाटपाचा निर्णय,आमच्या तिन्ही पक्षातील पक्षश्रेष्ठी घेतील, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेची मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली.
बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि काही एसटी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आंदेकर खून प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय. वनराज यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रायव्हरने वार करण्यात आले होते.या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता.
ज्या राज्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत, त्याच ठिकाणी नाफेडकडून कांदा विक्री होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात नाफेड कांदा विक्रीला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा,वाशिम,रिसोड आणि मंगरुळपिर या 4 ही एसटी आगारातील एकूण 877 कर्मचारी बेमुदत आंदोलन करत असून आज दुसऱ्या दिवशी ही एकूण 891 बसफेऱ्या बंद राहणार आहेत. सटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे वेतन देण्याच्या प्रमुख मागणी सह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी कालपासून धरणे आंदोलन करत असल्याने एसटी ची पूर्णतः ठप्प पडली आहे.यामुळे काही विद्यार्थी,महिला आणि वृद्ध प्रवाशांचे अतोनात हाल होत असून बसस्थानकावरून परत जावे लागत आहे.
Beed Crime News : बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या पांढरवाडी येथील, बालाजी घरबुडे या युवकाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यानंतर या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी बीडचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत ठिया दिला. यावेळी पोलिसांनी समजूत घातली तरी नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आधी आरोपीना अटक करा, मगच शवविच्छेदन करू, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित पवार यांचे खंदे समर्थक नाना काटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे सांगत बंडाची भाषा बोलायला सुरुवात केलीय.
ST bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा दुसरा दिवस असून आज देखील नाशिकच्या आगारांमधून एकही एसटी बस धावू शकलेली नाही. त्यामुळे आज देखील एसटी बस स्थानकावर शुकशुकाट पसरल्याच पाहायला मिळतंय. एकट्या नाशिक आगराच या संपामुळे एका दिवसात तब्बल ३६ लाख रुपयांच नुकसान झालंय.
Pune Crime : भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा २ जणांनी चाकू खुपसून खून केल्याची घटना पुण्यात घडली. सुनील सरोदे असं खून झालेल्या तरुणाच नाव आहे. रोहन कांबळे, शिवशरण कांबळे असे ताब्यात केलेल्यांची नावं आहेत.
Pune Crime : खुनी हल्ल्यातील अट्टल गुन्हेगाराला पाठलाग करून चतु:शृंगी पोलीसांनी पकडले आहे. रोहित उर्फ भोऱ्या मधुकर शिंदे, वय 21 वर्ष रा. दुसरा कॅनॉल, पांढरस्थळ, गणपती मंदिराजवळ, उरळीकांचन असे या आरोपीचे नाव असून खुनाचा प्रयत्न, खंडणी इत्यादी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत .सोमेश्वर वाडी पाषाण पुणे येथे सापळा रचून रोहित उर्फ भोऱ्या मधुकर शिंदे, वय 21 वर्ष रा. दुसरा कॅनॉल, पांढरस्थळ, गणपती मंदिराजवळ, उरळीकांचन, पुणे यास शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. या आरोपीने त्याचा गुन्हेगार मित्र सुधीर गवस याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या इतर साथीदारांसह हातामध्ये कोयते घेऊन येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन खुनाचा प्रयत्न केला होता.
पुढील 3 दिवसात 7,8,9 रोजी 3 पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, असे शरद पवारांनी सांगितले.
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे आधी पाहावं लागेल आणि त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
Pune Crime : पुण्यातल्या गुलटेकडी परिसरात एका तरुणाचा खून करणारे आरोपी ही देखील मोक्काच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आहेत. सुनील सरोदे अस खून झालेल्या तरुणाच नाव,तर रोहन कांबळे, शिवशरण कांबळे या आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.रोहन कांबळे, आणि शिवशरण कांबळे हे सख्खे आहेत असून पूर्ववैमनस्यच्या वादातून खून झाल्याचं अंदाज आहे.
राज्यभरात सलग दुसऱ्या दिवशी एसटीचा संप सुरू आहे. सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांची गावाला जाण्याच्या मोठी गर्दी आहे. एसटी बंद असल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने सध्या गावाला जात आहेत. खाजगी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहनांकडून तिकीट दरापेक्षा शंभर ते दीडशे रुपये जास्त घेतले जात आहेत.
पेनटाकळी प्रकल्पाची पातळी वाढत असल्याने पेनटाकली प्रकल्पांमध्ये 78.57 टक्के जलसाठा वाढलाय. धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून 330 क्यूसेसने पाणी विसर्ग होत असल्याने पेनटाकळी नदीकाठच्या 18 गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज एसटी संघटनांची बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर सायंकाळी ७ वाजता बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. वेतनवाढीच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांची मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरलीय. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या बैठकीत तोडगा निघणार का ? याकडे सगळ्यांचा लक्ष लागलेलं आहे.
आज सकाळी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 91 टक्क्यांवर पोहचलाय. आज आवक कमी झाली आहे. सध्या 6 हजार 174 क्यूसेक इतकी आवक सुरू आहे. काल दुपारपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. शिवाय आणि नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे गोदावरी नदीतून येणारी आवक ही कमी झाली आहे. शिवाय जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग केला जातोय. त्यामुळे आता सध्या हळूहळू जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. जवळपास 95% च्या वर त्यानंतर पाणी सोडणे बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.