मुंबईतील काळबादेवी परिसरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू तर एक जखमी झालाय. फणासवाडीतील इमारतीची ३० फूट लांब भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीय. शेजारील इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना ड्रिल मशीनच्या हदऱ्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती मिळालीय. विनयकुमार निशाद,३० आणि रामचंद्र सहानी,३० यांचा मृत्यू तर सनी कनोजिया वय १९ जखमी अशी जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे.
2019 ला महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर 16 जागांवर अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात चर्चा सुरू आहे. काही जागांवर तिन्ही पक्ष तर काही जागांवर दोन पक्ष दावा करत आहेत.
रत्नागिरी - राजापूर जवळच्या अणुस्कूरा घाटात तिसऱ्या दिवशी वाहतूक सुरू झालीय. घाटात शनिवारी दरड कोसळली होती. अद्यापही मोठे दगड फोडण्याचे काम सुरू, मात्र एकेरी वाहतूक सुरू आहे. सायंकाळी उशीरा घाटमार्गे दुहेरी वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे.
विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेस 33 तर नॅशनल कॉन्फरन्स 52 जागा लढणार आहेत.बाकी 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. थोड्याच वेळात औपचारिक घोषणा होणार असल्याचं माहिती देण्यात आलीय. काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची भेट घेत युतीची घोषणा केली होती.
जे एम रस्ता,विद्यापीठ रोड,संचेती चौक परिसरात वाहतूक कोंडी झालीय. नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते बंद आहेत.भिडे पूल अजूनही पाण्याखाली आहे. पेठेतील अनेक छोट्या रस्त्यांवर वाहतूक जॅम झालीय.
सरकार शिवद्रोही आहे. सरकार शिवाजी महाराजांचा फक्त भावनिक राजकारणासाठी वापर करतं आज हे सिद्ध झालं जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय शिवस्मारक मुंबईमध्ये उभा करू शकत नाही, तेच शिंदे-फडणवीस, पवार सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यात भ्रष्टाचार करण्यासाठी व्यवस्थित उभा करू शकत नाही. याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असू शकते? सरकारच्या या ढिसाळ कारभाराचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध आहे. पंतप्रधानांच्या प्रेमापोटी चुकीच्या पद्धतीने पुतळा उभा करणे हाच खरा शिवद्रोह आहे असल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते म्हणालेत.
ज्यात एका मागून एक अत्याचार आणि बलात्काराच्या घटनेच सत्र सुरूच आहे. मागच्या 5 दिवसा खालीच 4 वर्ष 10 महिन्याच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आज पुन्हा लातूरच्या औसा तालुक्यातील भेटा गावातील 70 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरण : महिला पत्रकारासोबत गैरवर्तन करणारे शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण न्यायालयात अर्ज केला आहे.वामन म्हात्रे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अर्जावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे .
महाविकास आघाडीची मुंबईतील जागावाटप संदर्भात ही दुसरी बैठक आहे. यामध्ये जवळपास मुंबईतील जागावाटप निश्चित होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड राखी जाधव,
काँग्रेसकडून भाई जगताप वर्षा गायकवाड अस्लम शेख
शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई संजय राऊत
छत्रपती संभाजीनगर शहरातील राडा प्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या 32 कार्यकर्त्यांवर तर शिवसेनेच्या तब्बल 28 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे , विष्णू पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रायगड जिल्हा मुंबई गोवा महामार्ग पहाणी दौऱ्यादरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाने निषेध आंदोलन केले.
खासदार कंगना रणौत यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी संबंध नाही, असं पत्रक पक्षाकडून जाहीर करण्यात आलं आहे. कंगना राणौत यांनी व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत मत असल्याचं पक्षाने म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर बलात्कार झाले होते, असं कंगनाने वक्तव्य केलं होतं.
रत्नागिरीत नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीतील चंपक मैदानामधील घटना घडली आहे. मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व स्टाफ रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज बंद केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्टला पालघर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराच भूमिपूजन होणार आहे. सध्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी पालघरच्या सिडको मैदानावर सुरू आहे.
वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ल्या केल्याप्रकरणी गणेश शाखेच्या पोलिसांनी आज दोन आरोपींना अटक केली आहे. सोलापूर मधील वरवड टोलनाक्या जवळ या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या दोन्ही आरोपींवर याआधी पुण्यात अनेक ठिकाणी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. कालच्या हल्ल्याच्या प्रकरणी आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
धुळ्यात सलग चौथ्या दिवशी देखील पावसाचा कहर बघावयास मिळत आहे, पांझरा नदीवरील धुळे शहरातील तीनही पूल पाण्याखाली गेले आहेत, अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पांझरा नदीत विसर्ग केला जात आहे, त्यामुळे शहरातील तीनही पूल बुडाल्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक फक्त एकाच पुलावरून सुरू आहे,
चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जनजीवनावर परिणाम होतांना दिसून येत आहे, धुळे शहरातील पांझरा नदीवरील कालिका माता मंदिर पूल, गणपती पूल व सावरकर पुतळा हे तीनही पूल पाण्याखाली गेले आहे,
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मस्के कुटुंबाकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. माञ वेळीच पोलीस प्रशासन दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी ग्रामपंचायत अंतर्गत 11 कामे करण्यात आली. मात्र त्याची 96 लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली. त्यामुळे सरपंच शशिकला भगवान मस्के, मयुरी मस्के आणि बाळासाहेब मस्के या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर डिझेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान पोलीस प्रशासन दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. मस्के कुटुंबाला शिवाजीनगर पोलीसांनी पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. जवळपास तासभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा गोंधळ सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाची देखील धांदल उडाली.
भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे 'ब्रँड ॲम्बेसेडर होणार आहेत.
आपल्या अनेकविध मिठाई, नमकीन आणि एकाहून एक सरस स्नॅक्स पदार्थांसाठी भारतभर नावलौकिक असलेले चितळे बंधू मिठाईवाले यावर्षी आपल्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना 'क्रिकेटचा देव' अशी ओळख असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे ब्रँड ॲम्बेसेडर असतील अशी घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार व इंद्रनील चितळे यांनी केली आहे.
पुण्यात खडकवासला परिसरात इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या अकरा वर्षांच्या मुलीवर एका विकृत नराधमाकडून खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खडकवासला येथे घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप नामदेव मते (वय ६७ वर्षे, रा. खडकवासला) याला अटक करण्यात आली आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 ला उद्घाटन झाले होते. नौदल दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान सिंधुदुर्गात आले होते. याचवेळी राजकोट येथील किल्ल्यावर बांधलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. किल्ल्ला व पुतळ्याचे निकृष्ट काम झाल्याचे आरोप होत होते. आज अखेर हा पुतळा कोसळला.
बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव चे धरण आता १०० टक्के भरले आहे .. धरणाच्या सांडव्यातून सुद्धा पाणी वाहत आहे . . मागील आठवड्यात याच धरणात 21 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. मात्र मागील दोन ते तीन दिवस धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने येळगाव येथील धरण पूर्णपणे भरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची इथ मुख्याध्यापकाला नागरिकांनी शाळेतच चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्या प्रकरणी नागरिकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची धुलाई केली.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर गेल्या महिन्यात नव्याने सादर करण्यात आलेल्या ITMS (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) लाँचनंतर पहिल्या पंधरवड्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 18,488 वाहनधारकांना ई-चालान करण्यात आले आहे. अशी माहिती संयुक्त परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे. आतापर्यंत 7 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 19 जुलै रोजी ही प्रणाली सुरू केली होती. पहिल्या दोन आठवड्यात जवळपास 90 टक्के केसेस या वेगात गाडी चालवल्याबद्दल, 4 टक्के लेन कटिंगसाठी आणि बाकीच्या इतर गुन्ह्यांसाठी जसे की सीट बेल्ट न लावल्याबद्दल, महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग इत्यादी साठी करण्यात आला आहे. या ITMS प्रणालीमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वेगावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळणार आहे. तसेच वेगावर नियंत्रण आल्यामुळे अपघातांची संख्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा महत्वाचा मार्ग समजला जातो. एक्सप्रेस हायवेवरून दररोज साधारणतः 40 हजार गाड्या ये जा करतात तर विकेंड ला हा आकडा 60 हजार पर्यंत जातो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करत आहेत. पनवेल येथील पळस्पे फाटा येथून या दौऱ्याला सुरवात होत आहे. गणेशोत्सवापूर्वी कोकणातील मुख्य महामार्ग असलेल्या या रस्त्याची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. गेली १८ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. विशेषत: रायगड जिल्ह्यात महामार्गाचे काम अर्ध्याहून अधीक अपूर्ण आहे. महामार्गाच्या अनेक ठिकाणी काटकोनातील वळणे आहेत. अशा ठिकाणी नेहमी अपघात होतात. काही प्रसंगी प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे, अशा या जीवघेण्या महामार्गाचे काम गेली १८ वर्षे रखडलेले आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची तात्पर्ती डागडूजी केली जाते. पण काही दिवसात पुन्हा या महामार्गावर खड्डे आणि महामार्गावरील अर्धवट कामकाजामुळे धोकादायक वळणांमुळे अपघातांना सुरवात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अतीधोकादाय ठरलेल्या महामार्गाच्या विविध प्रश्नांवर नॅशनल हायवेप्राधिकारणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता झाली आहे आणि कशी पुर्ण होणार आहे याचीच पहाणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आज धाराशिव जिल्ह्यात आरक्षण बचाव मेळावा आंदोलन आहे.
ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्या रॅलीला सुरूवात झाली असून भुम गोलाई चौकात भव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीतुन फुलांची उधळण करत क्रेनच्या साह्याने हार घालण्यात आला. या रॅलीमध्ये जिल्हाभरातून ओबीसी समाज बांधव सहभागी झाले असून रॅलीनंतर ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.
प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोरील रास्ता दिव्यांग बांधवांनी अडवला. पुणे जिल्हा परिषद दिव्यांग विभागामधील रिक्त असलेल्या सहाय्यक सल्लागार पदे तत्काळ भरण्यात यावी, औंध येथे सुरू असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन इमारत बांधकाम प्रक्रियेतील अनियमित्तानंतर पुढील रक्कम ठेकेदार ला देण्यात येऊ नये. जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये दिव्यांगाच्या विशेष शाळेतील प्रतिनियुक्त कर्मचारी कार्यमुक्त करून संबंधित शाळांमध्ये वर्ग करावे, या मागण्यांसाठी दिव्यांग बांधव एकवटले.
दुचाकीने गावी सोडण्याच्या बहाण्याने एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला एका युवकाने अमरावती जिल्ह्यतील मार्डीच्या जंगलात नेले आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली..याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधमाला अटक केली.. आरोपी हा सरपंचाचा पुत्र आहे..
नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक लहान,मोठी धरण भरून वाहू लागले असून ,देवळा तालुक्यातील रामेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यावरून पाणी कोलती नदीत प्रवाहित झाले आहे,धरण भरल्याने देवळा तालुक्यातील पूर्व भागातील पाणी पुरवठा योजना तसेच सिंचनाचा प्रश्न यंदाच्या वर्षी सुटण्यास मदत झाल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहे,तर हे पाणी चणकापुर उजवा वाढीव कालव्याच्या माध्यमातून पुढे सोडण्यात येणार असल्याने त्याचा फायदा देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे
मुंबई गोवा हायवेबाबत मनसेने अनेकदा आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अनेक आंदोलन नाही या हायवे वर बघायला मिळाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आहे.. यातच मनसेला काही दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांनी हा रस्ता त्यांच्या हद्दीत येत नसल्याचे स्पष्ट केलं होतं.... मात्र तरीदेखील आज रवींद्र चव्हाण यांनी पाहणी दौऱ्यात बाग घेतल्यामुळे मनसेनं प्रश्न उपस्थित केले आहेत... शिवाय रवींद्र चव्हाण यांनी रस्त्याबाबत अनेकदा कोटी विधान केली असल्याचे मनसेचा आरोप असून पळस्पे ते गोवा पर्यंत कोणता रस्ता पूर्ण झाला आहे हे त्यांनी दाखवावे, असे चॅलेंज मनसेतर्फे देण्यात आले मनसेतर्फे मुख्यमंत्र्यांना ताफा थांबवून निवेदनही देण्यात येणार आहे..
Laxman hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. हाके यांचे ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. भूम शहरातील शासकीय विश्राम गृहापासून थोड्यात वेळात रॅली निघणार आहे.
हाकेंच्या दुपारी एक वाजता भुम नगर पालिकेसमोर जाहीर सभा आहे. हाके कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
दोन डिलिव्हरी बॉय मध्ये झालेला वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाले. पोटात चाकू खुपसून खून केला. पुण्यातील सिंहगड रोड भागातील नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आदित्य वाघमारे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघे ही मित्र असून सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये काम करतात आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईट साठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. दोघं ही जणं मूळ चे बीड जिल्ह्याचे असून गेल्या एक महिन्यापासून एकमेकांच्या ओळखीचे होते
काल दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोट वरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नऱ्हे भागात
भेटण्यासाठी ठरवलं. रात्री १०.३० वाजता ते दोघे ही भेटले मात्र वाद मिटण्याच्या ऐवजी त्यांच्यात अजून वादावादी झाली. दरम्यान, भिलारे ने त्याच्याकडील असलेला चाकू वाघमारे च्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारपूर्वी च त्याचा मृत्यू झाला.
Ajit Pawar : जीएसटी भवनची पाहणी करताना अजितदादांनी अधिकाऱ्यांना झापलं. छा छू गिरी करू नका, ड्रेनेज लाईनचे काम करताना लक्षात नाही आलं का तुमच्या? जीएसटी भावनाच्या नव्या इमारतीत ड्रेनेज लाईनचे झाकणं वरती आल्यामुळे अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकलेत
Balwant Wankhede : अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाल्याची घटना घडली होती..या घटनेतील जखमींची काँग्रेस नेते व खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली, तसेच जखमी रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सांत्वना व्यक्त केल्या...तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रीती मोरे यांना त्यांनी जखमी रुग्णांवर गतीने वैद्यकीय उपचार करावे तसेच योग्य त्या वैद्यकीय सुविधा देण्याच्या सूचना देखील केल्या...
ST bus workers strike : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात आहेत. कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. ३ सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली.
Dhue Dam News : अक्कलपाडा धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रामध्ये जवळपास 31300 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदीपात्रामध्ये करण्यात येत आहे,
अक्कलपाडा धरणाच्या पाणलक्षेत्रामध्ये झपाट्याने पाण्याची आवक वाढत असल्यामुळे पुढील काही तासांमध्ये हा विसर्ग जवळपास 40 ते 45 हजार क्युसेक वेगाने वाढण्याची शक्यता ही प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आलेली आहे, त्यामुळे पांझरा नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे.
Maharashtra Politics : राज ठाकरे कधी भाजप विरोधात, कधी त्यांच्या बाजूने बोलतात, कधी पवार साहेबांच्या बाजूने तर विरोधात बोलतात, त्यांची भूमिका नेहमी बदलत राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एकच आमदार आहे. एक नाशिकची महानगरपालिका होती. परिस्थिती त्यांचं कोणीही निवडून आलं नाही यावरूनच दिसते की त्यांच्यावरही विश्वासहार्ता कुठेतरी कमी होत चालली आहे, ते आज पवार साहेबा बद्दल बोलत आहे. काही दिवसापूर्वी मोदी साहेबांबद्दल बोलत होते, असे रोहित पवार म्हणाले.
Marathi News : लदाखमधे आता नवे 5 जिल्हे तयार झाले आहेत. गृह मंत्रालयाने नव्या जिल्ह्यांची यादी जारी केली. जांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवे 5 जिल्हे तयार करण्यात आले आहेत.
Crime News : नवाब मलिक यांच्या मनी लॉन्ड्रीग केसचा वापर करत २.७३ कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे.
फसवणूकीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, निवृत्त पोलीस उपायुक्त प्रदीप सावंत तसेच मुख्यमंत्री यांचे ओएसडी असलेले पोलीस उपायुक्त बाळसिंह राजपूत यांच्या नावांचा वापर करण्यात आला.
चौघांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नवाब मलिक यांच्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची पीडितांना त्यांना भीती दाखवण्यात आली होती. ED, CBI, ANC आणि NCB या तपास यंत्रणांची भीती दाखवण्यात आली होती.
पोलिसांच्या गणवेशात व्हिडिओ कॉल करून तसेच बनावट कोर्टाचे आदेश आणि खोटे अटक वॉरंट दाखवून घालण्यात आली भीती. फसवणूक झालेल्यांमध्ये तिघे ज्येष्ठ नागरिक असून बड्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर होते नोकरीस तर विलेपार्ले कॉलेज येथील 41 वर्षीय सहाय्यक प्राध्यापकाला गंडा घालण्यात आला.
Badlapur News : कारवाई वेळेत न झाल्याने बद्दलापूरचा उद्रेक झाला असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
बदलापूरसंदर्भातील अहवाल मला प्राप्त झाला आहे त्याचा आधार घेऊन पोलिस कोणाला सह आरोपी करायचं आहे ते पाहतील. कोणाला ही सोडणार नाही, असे केसरकर म्हणाले.
Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांचा हा संघटनात्मक दौरा आहे. कुणाच्या हॉटेल व घराबाहेर आंदोलन करायल नको होतं. आंदोलनासाठी काही स्थळ ठरलेली आहे. काल आम्ही आंदोलन केले ते पंतप्रधान यांचा मान ठेवला. पोलीस आणि भाजप एकत्र येऊन आले तरी आम्ही पुरून उरु, असे अंबादास दानवे म्हणालेत.
जो समोर येईल त्याचा चुराडा होईल ही आमची धमकी आहे. आम्ही हात बांधून राहणार नाही. तोंडाला पट्टी बांधली तो आंदोलन झालं आता आरे ला कारे करूच , असेही दानवे म्हणाले.
बदलापूर बालअत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्याची आधारवाडी कारागृहात रवानगी होणार असल्याची माहिती मिळतेय.
बदलापूर प्रकरणातील आरोपी आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टात हजर केलं केलंय. विशेष महिला न्यायाधीश व्ही ए पत्राववळे यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.
'कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती, असा दावा काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांनी केला आहे.
'दोन दिवसापूर्वी मला फोन करून 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती'
'भाजपाला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत, त्यासाठी मला फोन आला होता पण मी नकार दिला'
'कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप'
मला ज्यांनी फोन केला होता त्याची ऑडिओ माझ्याकडे आहे योग्य वेळी ती आम्ही बाहेर काढू - गौडा
Baramati News : बारामतीत 8 नंबर boys ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार यांचा एकत्रित बॅनर फोटो आहे. जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. जयसिंग देशमुख हे बारामती नगरपालिकेची निवडणूक अपक्ष लढवून नगरसेवक झाले होते.
शेकडो मोकाट जनावरांनी बीड शहरातील मुख्य महामार्ग जाम केले आहेत. शहरातील बीड -सोलापूर, बीड -जालना, बीड - अहमदनगर आणि बीड शहरातील चौका चौकातील मुख्य रस्त्यावर,शेकडो मोकाट जनावरे रस्ता अडवून बसत आहेत. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. तर या सर्व प्रकाराकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याने, वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे..
दरम्यान शहरातील मुख्य महामार्गावर अन रस्त्यांवर हे मोकाट जनावरे मध्यभागी बसत असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर यामुळे वाहनांच्या रांगा लागत असून वाहन कोंडीचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बीड शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला असतांना नगर पालिका मात्र याकडं दुर्लक्ष करत आहे. यामुळं तात्काळ शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
badlapur case : बदलापूर अल्पवयीन मुलींवर लैंगिक मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची आज पोलीस कोठडी संपणार आहे. अक्षय शिंदे याला आज सकाळी साडे दहा ते अकरा दरम्यान कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कल्याण कोर्टात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आलाय.
- महत्त्वपूर्ण व्यक्तीबाबत विचारायचं असेल तर विचारा, त्यांच्याबाबत विचाराचे असेल तर सामान्य व्यक्तींना विचारा. माझ्या मातदारलंघाततील महत्त्वाचा प्रश्न विचारा
- पार्थ पवार मोठे नेते, ते फक्त माझ्याच मतदारसंघात फिरतील असेल असं नाही. ते राज्यभर फिरू शकतात. त्यांचा पक्ष वेगळा. मोठ्या नेत्यांबाबत आपण काय बोलणार
- माझ्या विरोधात कोणी उभं रहावं, मतं खाण्यासाठी कितीही जणांना उभं करावं. पण तिथल्या जनतेवर माझा विश्वास आहे. कर्जत जामखेडच्या लोकांनी आम्हाला लढायला शिकवलं
- कर्जत जामखेडला मी सोडणार नाही. तिथूनंच लढणार. गेल्यावेळेसपेक्षा जास्त लिड मिळेल
- माझ्या महिला मेळाव्यात प्रेमाने सर्व बहिणी आल्या होत्यां मोदीजींच्या मेळाव्यात ५०० रुपये देऊन महिलांना आणलं होतं
- मोदीजी यांनी सांगितलं, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका. त्या व्यक्तिला जो कोणी मदत करत असेल. त्याला सोडू नका. याचा अर्थ.. मोदी साहेबांचा या सरकारवर विश्वास राहीला नाही. मोदी साहेबांनीच सांगितलं महायुतीच्या नेत्यांचं खरं नाही. इथे बदल होणार
- विदर्भात अनिल देशमुख पवार साहेब यांचे विश्वासू आहे. गेल्यावेळेक्षा जास्त जागा आम्ही लढू. महाविकास आघाडी जास्त जागा जिंकेल
- सलील देशमुख, अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातबाबात पवार साहेब ठरवतील. आमच्यात लोकशाही आहे.
-अनिल देशमुख ठरवतील नागपूर दक्षिण- पश्चिम मधून लढण्याबाबत. पण फडणवीसांच्या मतदारसंघात गडकरी यांची लीड कमी झालीय. तिथे नाराजी आहे. नागपूरात विकास बंद करा यासाठी आंदोलन होत आहे.
-अनिल देशमुख यांना सोपा मार्ग होता तिकडे जायचं की, जेलमध्ये जायचं. काही लोक भितीनं गेले. अनिल देशमुख ईडीला घाबरले नसलतील, तर मग ज्यांनी राजकारण खराब केलं त्या फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण- पश्चिम मधून अनि देशमुख लढणार असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतोय.
- अनिल देशमुख उभे राहीले तर ते फडणवीस यांचा चांगला चॅलेंज देतील. तिथे कॅाग्रेसचे पण नेते आहे
- मी गडकरी यांची भेट घेणार. मतदारसंघातील काही कामं आहे. त्यांच्यासारखे एकमेव नेते देशात आहे. त्यांच्या पक्षात.
- नविन पेश्न लागू केली असेल. कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं असेल तर आम्ही पण स्वागत करु
- नांदेडचे खासदार यांचं निधन झालं, दुःखद घटना आहे. कुटुंबासोबत आम्ही आहोत.
Jalgaon rain News : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यात ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली. दरम्यान, गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ५८० मिमी पाऊस झाला होता. मात्र, एवढा पाऊस यंदा केवळ तीन महिन्यांत झाला आहे. २०२३ मध्ये जून ते सप्टेंबरच्या १२२ दिवसांत एकूण सरासरीचा ५८० मिमी पाऊस या चार महिन्यांत झाला होता. मात्र, यंदा गेल्या वर्षी जो पाऊस १२२ दिवसांत झाला होता. तेवढाच पाऊस केवळ ८६ दिवसांत झाला आहे. दि. २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ५८४ मिमी एकूण सरासरीच्या ९०.४ टक्के इतका पाऊस झाला आहे.
chatrapati sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरामध्ये आज तिसऱ्या दिवशी सलग पॉलिटिकल राडा पाहायला मिळालाय. काल पंतप्रधान मोदी विमानतळावर आले तर त्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. संभाजीनगर शहरातील रामा हॉटेल समोर ही दोन्ही आंदोलन सुरु आहे.
Ujni Dam : उजनी धरणा मधून भीमा नदीपत्रात 50 हजार क्युसेकने सुरु असणारा विसर्ग रविवारी रात्री दहा वाजता वाढवून तो 70 हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. सध्या भीमा कोऱ्यात पावसाची धो धो सुरू असल्याने दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 71 हजार 755 क्युसेक्स इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग येत आहे.उजनी धरण हे 102 टक्के भरलेलं असल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील लोकांना उजनी धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव सह परिसरातील 95 भाविक देवदर्शनासाठी उत्तर प्रदेश व नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेले होते दरम्यान उत्तर प्रदेश मधून दोन बसद्वारे हे भाविक पोखरा वरून काठमांडूच्या दिशेने निघाले असताना यातील एक बस दरीत कोसळून यात सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला होता तर 16जण हे जखमी झाले होते. या अपघातातील मृतांचे मृतदेह ही जळगावकडे रवाना केल्यानंतर दुसऱ्या बसमधील सुखरूप असलेल्या भाविकांची केंद्र सरकारच्या वतीने रेल्वेद्वारे परतण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री हे भाविक भुसावळ रेल्वे स्थानकावर परतले असून रेल्वे प्रशासनाच्या वतीने या भाविकांची पाणी,जेवण व वैद्यकीय सेवेची सोय करण्यात आली होती.
Konkan Railway News : रत्नागिरी - कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ट्रँक टॅपिंग इंजिन रुळावर बंद पडलं. सावर्डे ते आरवलीच्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे ट्रॅक टॅपिंग इंजिन बंद पडलं. चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय.
आजच्या जमान्यात सुद्धा स्त्रियांवर अत्याचार होत आहेत.आपण एकत्र आलो तर हे पुरुष हिम्मत करतील का? आपण एकजूट नाही त्यामुळे हे सगळं चालू आहे. पकडा त्या पुरुषाला आणि मारा तिथेच. असं मला वाटतं, बाकी तुमचा निर्णय, पण मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही मला बोलवा आपण सगळे मिळून त्याला मारू... स्त्रीचा सन्मान कारण नाही त्याला या समाजात राहण्याचा अधिकार नाही. आपणच त्यांना धडा शिकवू. शासनाने पण त्यांना धडा शिकवायला पाहिजे आणि त्वरित ॲक्शन घ्यायला पाहिजे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
जैवविवीधतेने संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात दुर्मीळ ‘स्लेंडर लॉरिस’ अर्थात वनमानवाचे दर्शन झाले आहे. वनमानवाचा वावर कायम घनदाट जंगलात असतो. वनमानव हा लाजाळू प्राणी असल्याने त्याला लाजवंती असं देखील म्हणतात. मुळात याला पहिल्यांदा पाहिल्यानंतर माणसाचे लहान बाळ आहे असाच काहीसा भास होतो आणि हा प्राणी जंगलात राहत असल्याने वनमानव असं म्हटलं जातं. नुकतेच काही प्राणी अभ्यासक जंगल सफारी करत असताना हा वनमानव कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे वनमानवाचा सह्याद्री पट्ट्यातील अधिवास पुन्हा अधोरेखीत झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेत सुरू असलेला चव्हाट्यावर आला.स्वतः या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून संस्थेत सुरू असलेल्या आर्थिक गैर व्यवहराचा भांडाफोड केला आहे . तर संस्थेने खरेदी केलेली जमीन आणि पद भरती मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप डॉ गोपाळराव पाटील यांनी संस्थेच्या संचालक मंडळावर केला आहे. अध्यक्ष या नात्याने मला विश्वासात न घेता अनेक नवीन बँकांमध्ये खाते उघडून त्यावरून अपव्यवहार केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पत्रकार परिषद घ्यायला संस्थेच्या सभग्रहाकडे निघालेल्या अध्यक्षांनाच गेटवर अडविण्यात आले . संस्थेचे गेट बंद केल्याने.,डॉ गोपाळराव पाटील यांनी गेटवरच पत्रकार परिषद घेतली . त्यामुळे नामांकित असलेल्या शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने शिक्षण क्षेत्रात सध्या खळबळ उडाली आहे .
Rain Update : गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदी पात्रा बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी 26 फूट 5 इंचावर आहे. तर 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पुण्यातील भूमकर पुलावर अपघात झाला आहे. ट्रकचे चाक तुटून अपघात झालेला आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी नाही. हायवे पेट्रोलिंग स्टाफ सदर ठिकाणी हजर आहे. क्रेनला बोलावून सदर काढून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
mumbai goa highway : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यांंच्यासोबत मंत्री रवींद्र चव्हाणही पाहणी करणार आहेत.
12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चाव्हणही असतील
काँग्रेसचे नांदेड मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार वसंत चव्हाण यांचं आज सोमवारी पहाटे आजाराने निधन झाले. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळ हळहळलं असून दिग्गज नेते दु:ख व्यक्त करीत आहेत.
"खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे", असं ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.