Marathi News Live: पुणे वन जमीन प्रकरण : सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश

Maharashtra Breaking News Live today : आज सोमवार दिनांक १० सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Pune yewalewadi land case : पुणे वन जमीन प्रकरण : सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश

पुणे वन जमीन प्रकरणाची मोठी अपडेट "येवलेवाडी येथील जमीन देण्याबाबत तात्काळ सुरूवात करा. सहा आठवड्यात ताबा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करा. तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा. जागेवरील अतिक्रमण तातडीनं हटवा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. ३ महिन्यात आम्ही जामीन याचिकाकर्त्यांना देऊ अशा पद्धतीचं हमीपत्र राज्य सरकारने कोर्टाला दिलं आहे

mla disqualification case : आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी होण्याची शक्यता

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी होण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी उद्याची तारीख केली निश्चित

आज कोर्टाने ही सुनावणी बुधवारी १८ सप्टेंबरला घेऊ असे संकेत दिले होते.

मात्र कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत या दोन्ही प्रकरणाचा समावेश

Hingoli News : लाडकी बहीण बँकेच्या रांगेत असताना गोंधळ, दोन महिला जखमी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलांमध्ये गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाल्याने हिंगोलीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे खात्यात जमा झालेले पैसे केवायसी अपडेट असल्याशिवाय मिळत नसल्याने शेकडोंच्या संख्येने या महिलांनी बँकेच्या बाहेर रांगा लावल्या होत्या. दरम्यान अचानक रांगेत असलेल्या महिलांनी एकमेकांना ढकलल्याने अनेक महिला जमिनीवर कोसळल्या त्यामध्ये दोन महिलांना गंभीर इजा झाली आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने रुग्णवाहिकेतून या महिलांना रुग्णालयात भरती केले आहे. तर त्यांच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला

राज ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरे आज लालबाग-परळमधील गणेशोत्स मंडळांना भेट देणार 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लालबाग-परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देणार आहेत. लालबाग-परळ मधील प्रमुख मंडळांच्या बाप्पांचं राज ठाकरे दर्शन घेणार आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच चिंचपोकळीच्या चिंतामणी सह इतरही मंडळांना राज ठाकरे भेटी देणार आहेत.

मणिपूर राज्यातील इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा बंद, सरकारचा निर्णय

मणिपूर सरकारने आज दुपारी 3 ते 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील ५ दिवसांसाठी राज्यातील इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा बंद आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्ण घेतलाय. मागच्या काही दिवसांपासून मणिपूरमधे पुन्हा हिंसाचार होत असून त्यावर नियंत्रण मिळवणे सरकारला कठीण जात आहे.

एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशावर गिरीश महाजन यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

नाथाभाऊंची दुटप्पी भूमिका असून त्यांना सर्व पक्ष व सर्व पद आपल्याच घरात पाहिजे असल्याच म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षाप्रवेशावरून देखील निशाणा साधला. एकनाथ खडसे यांनी त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला असेल तर तसे फोटो त्यांनी दाखवावे, असे म्हणत एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत सांगण्यात आलेल्या पक्षप्रवेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये भाजपची देखील आक्रमक भूमिका

- शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये भाजपची देखील आक्रमक भूमिका

- नाशिकमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार, त्यामुळे तिन्ही जागा भाजपच लढवणार

- भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी शिवसेनेचा नाशिक मध्य विधानसभेवरील दावा फेटाळला

- नाशिक मधून अजय बोरस्ते आमदार होतील, संजय शिरसाठ यांनी काल केला होता दावा

- अजय बोरस्ते नाशिक मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आहेत इच्छुक

- मध्य मतदारसंघ सध्या भाजपकडे, देवयानी फरांदे गेल्या दोन टर्म पासून आहेत आमदार

पंतप्रधान कार्यालयासाठी चंद्रपुरातून सागवान दिल्लीसाठी रवाना

नवीन पंतप्रधान कार्यालयासाठी लागणारे सागवान लाकूड आज चंद्रपुरातून दिल्लीकडे रवाना झाले. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या वतीने हे लाकूड पाठवण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत काष्ठ पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पूजेनंतर काष्ठ भरलेला एक ट्रक दिल्लीकडे रवाना झाला. सुमारे तीन हजार घनफूट उच्च प्रतीचे सागवान पंतप्रधान कार्यालयासाठी पाठवले जाणार आहे. त्याची पहिली खेप आज पाठवण्यात आली.

वनमंत्री मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवत सागवान भरलेला ट्रक रवाना केला. सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली येथील जंगलातील हे साग आहे. अलापल्लीचे सागवान देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयासाठी ते पाठवले जात आहे. यापूर्वी हे सागवान अयोध्येला श्रीराम मंदिरासाठी आणि नव्या संसदेसाठी पाठवण्यात आले. आता देशाचे पंतप्रधान या सागवानाच्या खुर्चीत बसणार आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का; वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा ठाकरे गटाला राम राम.

चिकटगावकर पुन्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता

चिकटगावकर हे गेल्या काही दिवसापासून पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा होती; आदित्य ठाकरे यांच्या वैजापूर तालुक्यातील दौऱ्यातही ते उपस्थित राहिले नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर

कौशल्य विकास विभागाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान उदघाटन करणार

राज्यातील एक हजार महाविद्यालयात शासनातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन केली जाणार

प्रत्येक महाविद्यालयातील 150 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार

दरवर्षी दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ

जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड महाराष्ट्र दौऱ्यावर

जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यातील ४१८ आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे करणार लोकार्पण

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आयोजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या आयटीआय मध्ये घेणार कार्यक्रम

एल्फिन्स्टन महाविद्यालय येथील कौशल्य विकास विद्यापीठात पार पडणार कार्यक्रम

रविवारी, १५ सप्टेंबरला होणार कार्यक्रम

Pune Traffic: गणेश भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट  पुण्यातील वाहतुकीत बदल

पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सायंकाळी पाच नंतर राहणार बंद

उद्यापासून शहरातील प्रमुख रस्ते १८ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी पाचनंतर बंद असणार आहे.

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यासह इतर रस्त्यांचा समावेश

पुण्यातील बंद ठेवण्यात येणारे प्रमुख मार्ग

लक्ष्मी रस्ता

छत्रपती शिवाजी रस्ता

बाजीराव रस्ता

टिळक रस्ता

सणस रस्ता

शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक

नागपूरातीस मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी विकास शुल्क कमी होणार

या प्रकल्पाला निधी देण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी झाली नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबतची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने घेतला पेट

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने घेतला पेट

वाढे फाटा जवळ असणाऱ्या वेण्णा नदी जवळ अचानक घेतला पेट

बसमधील प्रवासी तात्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला

अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू

अंबरनाथमध्ये १५ वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाचा अत्याचार

अंबरनाथमध्ये १५ वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

परभणी : गोपा येथील एकाची गळफास घेऊन आत्महत्या

गंगाखेड तालुक्यातील गोपा येथील विनायक रामराव गावंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. विनायक गावंडे(वय 35)गोपा शिवारातील त्याच्या मालकीच्या शेतात लिंबाच्या झाडाला बैलाच्या कासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

एमआयडीसीमध्ये फटका कंपनीला आग

नाशिक-पुणे रोडवर शिंदे एमआयडीसीमध्ये फटका बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आग कशामुळे लागली ते अद्याप अस्पष्ट आहे. पण परिसरात भितीचे वातावरण आहे. एमआयडीसीमध्ये अनेक कर्मचारी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आणि अग्निशामन दलाला याबाबत कळवण्यात आलेय. मदतकार्य सुरु करण्यात आल्याचं समजतेय.

मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण

आरोपी चेतन पाटील याला दिलासा; चेतन पाटील याची न्यायालयीन कोठाडीत रवानगी.

तर जयदीप आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचा रस्ता रोको.

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयाची मदत द्या.., तसेच सोयाबीनला प्रति प्रतिक्विंटल 8 हजार रुपयांचा भाव द्या ..,या मागण्यासाठी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या वतीने ठीय्या मांडत लातूर-बार्शी महामार्ग आडवत आंदोलन करण्यात आले आहे.. दरम्यान मागण्या मान्य नाही झाल्यास यापेक्षा ही , तीव्र आंदोलन करु, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड देखिल करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे..

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, २० मिनिट रेल्वे उशिराने

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

१५ ते २० मिनिट रेल्वे उशिराने सुरू

तांत्रिक बिघाड झालेचे सांगण्यात येत आहे

चर्चगेट कडे जाणाऱ्या गाड्या उरिशाने सुरु

नंदुरबार शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात

आज सकाळपासूनच नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातील इतर भागात पावसाचा जोर वाढला असून पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात तीनच महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे शेतात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. एकूण जिल्ह्यातील ज्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असेल त्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार 

Summary

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहे. जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना ही घोषणा केलीय. मनोज जारंगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.मात्र आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल आहे.

विधानसभेसाठी रावसाहेब दानवेंकडे मोठी जबाबदारी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे.

निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी चौधांवर गुन्हा

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी पाथर्डी तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा रुग्णालयाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती भरत हे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले. प्रसाद बडे ,सुदर्शन बडे ,गणेश पाखरे,सागर केकाण अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जिल्हा रुग्णालयातील अज्ञात दोन कर्मचाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.

छत्रपती संभाजीनगर : राजश्री उंबरे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9 दिवस

Summary

मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या 9 दिवसापासून छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकात राजश्री उंबरे या आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत आज त्यांच्या उपोषणाचा 9 दिवस असून त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आज डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना सलाईन लावण्यात आलेलं शिवाय त्यांचा रक्तदाबही तपासण्यात आला आहे. त्यामुळे हीच स्थिती अजून दोन दिवस राहिली तर त्यांची प्रकृती अजून चिंताजनक होईल असं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान 17 सप्टेंबर पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर एकाही मंत्र्याला मराठवाड्यात ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा दिला आहे शिवाय 18 सप्टेंबरला देहत्याग करणार अशी भूमिका राजश्री उंबरे यांनी घेतली.

धुळे : 20 ते 25 मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

धुळे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौरापूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांतर्फे ताब्यात घेण्याच सत्र सुरू

मराठा आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात कुठलाही प्रकारचा धुडगूस घालू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मराठा आंदोलकांना घेण्यात आले ताब्यात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम पडणार आहे पार

मराठा आंदोलकांनी फडणवीस यांना भेटू देण्याची केली होती इच्छा जाहीर

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जवळपास 20 ते 25 मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

७६ वर्षीय वैज्ञानिक बांद्राच्या राहत्या घरातून बेपत्ता

स्मृतीभ्रशाने (अलझायमर) ग्रस्त असलेले ७६ वर्षीय वैज्ञानिक बांद्राच्या राहत्या घरातून बेपत्ता

फुल आणायला जातो असे सांगून गुरुवारी सकाळी ९:३० ला पडले होते बाहेर

निर्मल नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल

विनायक कोलवणकर बीएआरसी मध्ये होते वैज्ञानिक

भूकंपांची पूर्वसूचना देण्यासंदर्भात केलं होतं कोलवणकर यांनी मोलाचं काम

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदक देऊन कोलवणकर यांचा केला होता गौरव

आमदार महेश शिंदे यांची शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टिका

शरद पवारांनी साता-यातील दौ-यात जिहे कटापुर योजनेवर भाष्य करत मी या योजनेबाबत तीन महिण्यांनी बोलेन असं सांगितलं होतं यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे संकेत दिले होते यावर महेश शिंदे यांनी शरद पवारांवर टिका केली असुन लोकसभा निवडणुकीत या आधी सुद्धा शरद पवारांनी इंडीयाचं सरकार येण्याबाबत भाष्य केलं होतं मात्र त्यांनी काही ही सांगितलं तरी जिहे कटापुर योजना दीड वर्षापुर्वीच पुर्ण होवुन पाणी सर्वत्र गेलं आहे.

Beed News : बीडमध्ये विविध मागण्यांसाठी सरपंच परिषद आक्रमक 

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामपंचायत भवन देण्यात यावं, ग्रामपंचायतला 15 लाख रुपये पर्यंतचे काम करण्याचा जी.आर तात्काळ देण्यात यावा, कोरोना काळात जे सरपंच मयत झालेत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात आता सरपंच परिषद आक्रमक झाली आहे. येणाऱ्या 10 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण करा , अन्यथा आम्ही सर्व सरपंच परिषदेचे कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करू, असा अल्टिमेटम आणि इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिला आहे...

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी पुढे ढकलली, १८ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता

आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार नाही. आजची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. प्रकरण नंबर १ आज दिवसभर ऐकलं जाणार असल्याने ही सुनावणी आज होणार नाही. या प्रकरणी पुढच्या बुधवार १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Thane Rain :  ठाण्यात सकाळपासुन पावसाची हजेरी 

मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने आज सकाळपासुन ठाणे शहरात हजेरी लावली आहे. सकाळपासुन शहरातील पाचपाखाडी, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

पोषण मंडपातच भरली शाळा; राष्ट्रगीताचे स्वरही निनादले.

Summary

अमरावतीच्या अंजनगावसुर्जी तालुक्यांतर्गत येणारा चौसाळा ते निमखेड बाजार हा डांबरी मार्ग दोन ते तीन वर्षापासून अतिशय खराब झालाय.. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना याच जीवघेण्या रस्त्यावरून शाळेसाठी प्रवास करावा लागतोय. नादुरुस्त रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने निमखेड येथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यानी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी उपोषण मंडपातच राष्ट्रगीतही म्हटले व शालेय साहित्यिक घेऊन त्या ठिकाणी शाळा देखील भरवल्याचे पाहायला मिळाले.. या रस्त्याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे व हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बारामती : आजपासून युगेंद्र पवार यांची बारामती स्वाभिमानी यात्रा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू असतानाच त्यांचे पुतणे शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी यात्रेला सुरुवात केलीय. बारामतीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण हे तापू लागले आहे. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे मारुती मंदिरात दर्शन घेऊन युगेंद्र पवार आपल्या यात्रेची सुरुवात केलीय ..त्यानंतर ते माळावरची देवी दर्शन घेऊन पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

गोंदिया शहरातुन वाहणाऱ्या नाल्याजवळचे घर कोसळले, एकाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने जिल्ह्याभरात पूर् परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेल्या एक घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.. तर एक महीला घराखाली दबल्याची माहिती आहे.. महीलेचा शोध सुरू आहे...तर एक जण थोडक्यात बचावला आहे. दिपिन अग्रवाल (27) मृतकाचे नाव असून व किरण अग्रवाल (50) या खाली मलम्या खाली दबल्याची माहिती आहे.. तर अनिल अग्रवाल (52) हे यातून थोडक्यात बचावले आहेत.दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून.. किरण अग्रवाल यांचा शोध कार्य प्रशासनाच्या वतीने सुरू आहे...

शहराध्यक्ष दिपक मानकर यांना विधानपरिषद द्या ,पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी 

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून विधानपरिषदेच्यासाठी विविध नेत्यांचे नाव पुढे येत असताना आज पुणे शहरातील जवळपास शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेत शहराध्यक्ष दिपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Rain Update : भामरागड मधील पूरस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम

गडचिरोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही भामरागड मधील पूरस्थिती कायम असून येथील जवळपास 50 हून अधिक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथील बाजारपेठ पूर्णतः पाण्याखाली असून अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. परिणामी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी नासधूस झाली आहे. तर दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातही पूरस्थिती उद्भवली असून करजेली गावातील 28 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

भंडाऱ्यात मद्यधुंद कारचालकाने युवकाला उडविले

मद्यधुंद चार चाकी वाहनाने एका युवकाला उडविल्याची घटना तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड समोरिल हसारा रोड वरिल सिनेमा गृहा समोर घडली असून सदर अपघातात तुमसर शहरातील अंकुश निखाडे नामक युवक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.या कारने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उतरली. अपघातात अंकुश निखाडे हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक व कारमधील त्याचे मित्र मद्यधुंद स्थितीत होते, अशी माहिती पुढे आली आहे.

गोमाल गावात आतिसाराने झालेले आदिवासींचे बळी हे तर राजकीय अनस्थेचे बळी , विरोधकांचा आरोप.

बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या गावात गेल्या दहा दिवसापासून अतिसाराच्या साथीने तीन आदिवासींचा मृत्यू झाला आहे, तर अद्यापही गोमाल या गावात परिस्थिती नियंत्रणात नसल्याची ग्राउंड रियालिटी समोर आली आहे. अजूनही आदिवासी बांधवांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. आरोग्य प्रशासनाने थातूरमातूर वैद्यकीय पथक या गावात पाठवले आहे.

जालना शहराजवळील जामवाडी भागात तरुणाची हॉटेलवर हत्या

जालना शहरात जवळील जामवाडी येथे एका हॉटेल वरती एका तरुणाची निर्गुण हत्या झाली , या घटनेनंतर गाव आणि परिसरामध्ये मोठा जमाव एकत्रित आला, त्यामुळे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला.

काही लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचा गैरफायदा घेऊन त्यांचा विश्वासघात केला. मला सहा वेळा निवडून दिलं म्हणून आता हवा बदलली असेल असं काहींना वाटतं. अशी हवा बघत राहाल तर तुमचं वाटोळच होईल. मी शरद पवार यांना सांगूनच बाहेर पडलो. भावनेच्या भरात जाऊ नका नाहीतर आपलं वाटोळं होईल.
हसन मुश्रीफ
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री चेहऱ्यावर उत्सुकता असल्यानं मुख्यमंत्री आमचा होईल, गणपतीनंतर सर्व चर्चा होणार आहे.
जयंत पाटील

Rain Update : भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट, गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडले...

भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असुन वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 25 दरवाजे 0.5 मिटर ने उघडण्यात आले असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पावसाची संततधार अशीच कायम राहिली तर आणखी पाणी सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Nashik News : पंचवटी कारंजा परिसरात युवकाची हत्या

नाशिकमध्ये पंचवटी कारंजा परिसरात युवकाची हत्या झालीय. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घटना घडलीय. म्हसरूळ परिसरातील अतुल सूर्यवंशी नामक युवकाची रात्रीच्या सुमारास हत्या झाली. डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून ठार केल्याचं समोर आलंय. एका संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आलीय तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

-

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये दीड महिन्यात स्वाईन फ्लूचे 59 रुग्ण

छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्हाभरात मागील दीड महिन्यात स्वाईन फ्लूचे 59 रुग्ण हे आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने विळखा घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून असे असले तरी कोणतीही गंभीर स्थिती नसल्याच आरोग्य विभागाने सांगितलय. पावसाळा सुरू झाल्यानंतर बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू,टायफाईड,हिवताप आणि स्वाईन फ्लूने डोकं वर काढले असून शहरातील घाटीसह खाजगी रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करावे अस आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलय.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज विदर्भात

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज विदर्भात आहे. तुमसर, तिरोडा, अर्जूनी मोरगाव येथे मेळावे होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, मेहबूब शेख, रक्षा खडसे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

Marathwada Rain : मराठवाड्यात अतिवृष्टी ; १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील फळबागांना फटका

मागील पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. त्या नुकसानीचे आतापर्यंत ३९.६५ टक्के पंचनामे झाले आहेत. ७ लाख २० हजार हेक्टरवरील पंचनामे झाले असून, ११ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे अद्याप शिल्लक आहेत. मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांचे १८ लाख ५ हजार ८६२ हेक्टरवरील खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. यात १७ लाख ५६ हजार ८८९ हेक्टरवरील जिरायत, २७ हजार ८६३ क्षेत्रावरील बागा, तर २१ हजार ११० हेक्टरवरील फळबागांना पावसाचा तडाखा बसला. नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ९९३ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ५७८ हेक्टर, हिंगोलीतील २ लाख ८१ हजार ६७९ हेक्टर, लातूरमधील २ लाख ६ हजार ६१४, तर जालना २ लाख १२ हजार ५६९, छत्रपती संभाजीनगर १ लाख ७६ हजार ९३६, बीडमध्ये १ लाख १८ हजार ४२५, तर धाराशिव जिल्ह्यात ६ हजार ६७ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

BJP News : मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज दुपारी बैठक

मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज दुपारी बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यानंतर होणाऱ्या बैठकीला महत्त्व प्राप्त होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. अतुल भातखळकर, आ. प्रविण दरेकर, आ. प्रसाद लाड व कोअर कमिटीतील इतर हजर राहणार आहेत. संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर खांदेपालट करण्यास नेतृत्व मान्यता देणार का ? याबाबत प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com