Maharashtra Assembly Elections 2024: वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी जाहीर, कोणाला दिली संधी?

Vanchit Bahujan Aghadi 2 List Of Candidate:
Maharashtra Assembly Elections 2024: वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी जाहीर, कोणाला दिली संधी?
Prakash AmbedkarSaam Tv
Published On

गिरीष कांबळे, मुंबई

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच होणार आहेत. दसऱ्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काही दिवसांपूर्वी वंचितने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज वंचित बहुजन आघाडीने दुसरी उमेदवारी जाहीर केली आहे. १० उमेदवारांची यादी वंचितकडून जाहीर करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे आज विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली. मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माढ, शिरुळ आणि सांगली या विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार खातिव सैय्यद नातिकुद्दिन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. बाळापूर जिल्हा अकोला विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी -

- मलकापूर - शहजाद खान सलीम खान

- बाळापूर - खातिब सय्यद नतीकउद्दीन

- परभणी - सय्यद सलीम सय्यद साहेबजान

- संभाजीनगर मध्य - मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक

- गंगापूर - सय्यद गुलाम नबी सय्यद

- कल्याण पश्चिम - अयाझ गुलजार मोहवी

- हडपसर - मोहम्मद अफरोज मुल्ला

- माढ - इमतियाज जफर नडाफ

- शिरुळ - अरीफ मोहम्मअली पटेल

- सांगली - अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com