Maharashtra politics : मोठी बातमी! पुण्यातून शिंदेंच्या शिवसेनेची माघार, एकही उमेदवार देणार नाहीत

Maharashtra Election News : पुणे शहरात एकनात शिंदेंना उमेदवार मिळत नसल्याचं समोर आलेय. एकनात शिंदे यांनी पुणे शहरातून माघार घेतल्याची स्थिती आहे.
Maharashtra politics : मोठी बातमी! पुण्यातून शिंदेंच्या शिवसेनेची माघार, एकही उमेदवार देणार नाहीत
CM Eknath Shinde Saam TV
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

Maharashtra Vidhan Sabha Election News : एकनाथ शिंदे यांनी पुण्यातून माघार घेतल्याचं समजतेय. पुणे शहरातील एकाही जागेवर एकनाथ शिंदेंची शिवसेना उमेदवार देणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

पुण्यातील विधानसभा लढवण्याचा शिवसेनेने दावा सोडला आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सेनेचा एकही इच्छुक उमेदवार नाही. पुणे शहरातील एका सुद्धा जागेवर शिवसेनेची लढाईची तयारी नाही, असे समजतेय.

Maharashtra politics : मोठी बातमी! पुण्यातून शिंदेंच्या शिवसेनेची माघार, एकही उमेदवार देणार नाहीत
Maharashtra Politics : भाजप १५५ जागांवर ठाम, शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा?

पुणे जिल्ह्यातील २ जागांवर शिवसेना आग्रही आहे. पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघांवर दावा करण्यात आलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महादेव बाबर मधून पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांचा नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Maharashtra politics : मोठी बातमी! पुण्यातून शिंदेंच्या शिवसेनेची माघार, एकही उमेदवार देणार नाहीत
Maharashtra Election : मविआच्या जागावाटपाचं नेमकं गणित काय? वाचा इनसाइड स्टोरी

कोकणात भाजप फक्त एक जागा लढणार ?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नमतं घेणार असल्याचं समजतेय. दोन्ही जिल्ह्यात भाजप फक्त 1 जागा लढवण्याची शक्यता असल्याचं समोर आलेय. रत्नागिरी जिल्ह्यात भाजप एकही जागा लढवणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे शिवसेना चार, तर चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार आहे. तर सिंधुदुर्गमध्ये 1 जागा भाजप लढवणार, 2 जागा शिंदेंची शिवसेना लढवणार आहे. निलेश राणे शिवसेनेतून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळूनही भाजप एक पाऊल मागे जात असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com