Kudal Vidhan Sabha 2024 : ठाकरे गटाचे कुडाळमधील उमेदवार वैभव नाईकांची संपत्ती तरी किती? आकडा वाचून फिरतील डोळे

Vaibhav Naik : वैभव नाईक कुडाळ विधानसभा मतदारसंघात सलग २ टर्म निवडून आलेत. २०१४ आणि २०१९ नंतर आता ते पुन्हा एकदा २०२४ च्या विधानसभेसाठी देखील रिंगणात उतरले आहेत.
Vaibhav Naik
Kudal Vidha Sabha 2024Saam TV
Published On

Kudal Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता विविध पक्षातील उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कालच कुडाळ विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. वैभव नाईक कुडाळ विधानसभा मतदारसंघात सलग २ टर्म निवडून आलेत. २०१४ आणि २०१९ नंतर आता ते पुन्हा एकदा २०२४ च्या विधानसभेसाठी देखील रिंगणात उतरले आहेत.

Vaibhav Naik
Maharashtra Assembly Election : सांगलीचं राजकारण पुन्हा तापलं; पृथ्वीराज पाटील उमेदवारीवर ठाम, म्हणाले तिकीट घेऊन येणार!

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यावर आपल्या संपत्तीची देखील माहिती द्यावी लागते. यात स्थावर, जंगम अशी सर्व संपत्ती नमूद असते. वैभव नाईक यांनी देखील उमेदवारी अर्जावर त्यांच्या संपत्तीची माहिती सांगितली आहे. त्यामुळे वैभव नाईक यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

वैभव नाईक यांच्याकडे स्थावर, जंगम अशी एकूण ३२ कोटी ५८ लाख ३२ हजार ५९९ रुपये इतकी संपत्ती आहे. इतकेच नाही तर त्यांच्यावर जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यात ५ फौजदारी खटले सुरू आहेत. कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

दाखल केलेल्या अर्जात वैभव नाईक यांनी स्थावर किती आणि जंगल मालमत्ता किती याची माहिती दिली आहे. यानुसार जंगम मालमत्तेमध्ये ७ कोटी ३१ लाख २ हजार २१५ रूपये त्यांच्या स्वताच्या नावावर आहेत. तर ३ कोटी ९२ लाख ८३ हजार ८४ रूपये पत्नीच्या नावे आहेत.

सामायिक मालमत्तेपैकी ९ लाख ८६ हजार ७५४ रूपये एवढ्या मालमत्तेचे विवरण दाखवले आहे.

घर, गाड्या आणि सोनं किती?

कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संपत्तीमध्ये फॉर्च्यूनर, स्कॉर्पिओ, जेसीबी ही वाहने आहेत. याची किंमत ४३ लाख ३० हजार ९२४ रूपये आहे. तर वैभव नाईक यांच्याकडे स्वत:चे २८१ ग्रॅम सोने असून त्याची किंमत २२ लाख ६२ हजार ८५८ रूपये आहे. ४११ ग्रॅम सोने पत्नीकडे असून त्याची किंमत ३४ लाख ९७ हजार १२२ रुपये आहे.

कर्ज किती

वैभव नाईक यांच्या नावाने आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने डोक्यावर एकूण ९१ लाख ७० हजार ३८१ रूपये कर्ज आहे. तसेच वैभव नाईक यांच्यावर ५ प्रलंबित फौजदारी खटले आहेत.

Vaibhav Naik
Maharashtra Assembly Election : साताऱ्यात महायुतीला मोठं खिंडार, अजितदादांनी मकरंद पाटलांना उमेदवारी दिली, शिंदेंच्या जाधवांचे बंड!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com