Maharashtra Assembly Election : सांगलीचं राजकारण पुन्हा तापलं; पृथ्वीराज पाटील उमेदवारीवर ठाम, म्हणाले तिकीट घेऊन येणार!

vidhan sabha election : २९ ऑक्टोबरला काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election
Published On

विजय पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीच्या विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक वर्षांपासून केलेले काम आणि पक्षाची एकनिष्ठा पाहता उमेदवारी मलाच मिळणार असा दावा पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीत पृथ्वीराज पाटील यांनाच उमेदवारी दिली पाहिजे, अशी घोषणाबाजी करत मागणी केली.

दोन दिवसात मुंबई वरून कॉग्रेस पक्षाचे तिकीट घेऊन येणार. येत्या 29 तारखेला काँग्रेसकडूनच अर्ज भरणार असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी फोनद्वारे माहिती दिली आहे. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम हे सुद्धा अर्ज भरताना उपस्थित राहणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election : साताऱ्यात महायुतीला मोठं खिंडार, अजितदादांनी मकरंद पाटलांना उमेदवारी दिली, शिंदेंच्या जाधवांचे बंड!

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज पाटील यांनी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना काटें की टक्कर दिली होती. त्यानंतर पृथ्वीराज पाटील हे थांबले नाहीत जनसेवा आणि समाजसेवा आणि पक्षाचे काम करत राहिले. आज अखेर त्यांच्या उमेदवारीवरून वाद उफाळला जात आहे. काँग्रेस पक्षाकडून मलाच तिकीट मिळणार असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे. 29 तारखेला काँग्रेस पक्षाकडून मीच अर्ज भरणार असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे. पण उमेदवारी मिळवण्यासाठी पृथ्वीराज पाटील हे गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. उमेदवारी घेऊनच ते सांगलीमध्ये अर्ज भरणार असल्याचे त्यांनी फोनद्वारे सांगितले आहे.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election : विधानसभेसाठी नितीन गडकरी अॅक्शनमोडमध्ये, फडणवीस-बावनकुळेंसोबत २ तास खलबतं

दरम्यान,गुरुवारी सांगली काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी यांची बैठक झाली. यामध्ये आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज पाटील यांनाच काँग्रेस पक्षाने तिकीट दिले पाहिजे, अशी मागणी करत पृथ्वीराज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी केली.

Maharashtra Assembly Election
Samruddhi Mahamarg : समृद्धीवर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रकला जोरदार धडक, केमिकलमुळे भीषण आग, वाहतूक ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com