Samruddhi Mahamarg : समृद्धीवर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रकला जोरदार धडक, केमिकलमुळे भीषण आग, वाहतूक ठप्प

Samruddhi Mahamarg News : वाशिमच्या कारंजा टोल प्लाझा जवळ पहाटे चार वाजता भीषण अपघात झालाय. दोन जण जखमी झालेत.
Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident News
Published On

मनोज जयस्वाल, साम टीव्ही प्रतिनिधी

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. पहाटे चार वाजताच्या सूमारास केमिकलच्या उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने येणार्‍या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रकला आग लागली. तात्काळ अग्निशामन दलाला पाचारण केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशिमच्या कारंजा टोल प्लाझा जवळ ही घटना घडली.

Samruddhi Mahamarg Accident News
Maharashtra Assembly Election : विधानसभेसाठी नितीन गडकरी अॅक्शनमोडमध्ये, फडणवीस-बावनकुळेंसोबत २ तास खलबतं

वाशिमच्या कारंजा टोल प्लाझा जवळ समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने घडक दिली. या धडकेत ट्रकनेने पेट घेतला. उभ्या ट्रकमध्ये केमिकलच्या कॅन होत्या. त्यामुळे झटक्यात आग लागली. अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण केले. अग्निशामन दलाच्या तीन गांड्यांनी आग अटोक्यात आणली. पण केमिकल कॅन फुटत असल्यामुळे नागपूर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. आज पहाटे चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली, तेव्हापासून वाहतूक ठप्प आहे.

Samruddhi Mahamarg Accident News
Maharashtra Assembly Election : साताऱ्यात महायुतीला मोठं खिंडार, अजितदादांनी मकरंद पाटलांना उमेदवारी दिली, शिंदेंच्या जाधवांचे बंड!

घटनास्थळी कारंजा नगर परिषद अग्निशामक दल, तसेच समृद्धी महामार्ग अग्निशामक दल, शिवणी टोल प्लाजा अग्निशामक दल यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली. आग लागलेल्या सदर ट्रकमध्ये पेंटचे केमिकल होते.

ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीचे काम चालू होते. त्याच वेळी मागून दुसऱ्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे स्पार्क होऊन ट्रकने पेट घेतला. ट्रकमध्ये केमिकल असल्यामुळे आगीचा भडका उडला. ट्रकमध्ये छोटे स्फोटही होत होते. अग्निशामन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली. या अपघातामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Samruddhi Mahamarg Accident News
Weather Forecast : कुठे ढगाळ, कुठे मुसळधार पाऊस; राज्यात आज कसे असेल वातावरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com