.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : राज्यात सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. निवडणुका केव्हा होणार? आचारसंहिता केव्हा लागणार? असे प्रश्न सर्वांसमोर आहेत. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती सामटीव्हीला सुत्रांनी दिलीय. तर निवडणूक आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिल्याचं समोर आलंय.
विधानसभा निवडणूक केव्हा होणार?
नवीन विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता आणखी काळ वाट पाहावी लागणार असल्याचं कळतंय. सध्या राजकीय नेते विधानसभेच्या कामात गुंतलेले दिसत (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणी देखील समोर आलीय. तर आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होणार असल्याचं सांगितलं जातंय. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये तर मतमोजणी नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचं समोर येत आहे.
ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार?
लोकसभा निवडणुकीत झालेला जोरदार राजकीय संघर्ष सर्वांनीच पाहिला आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय, तर महायुतीला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्यामुळे विधानसभेत मतांचं गणित बदलणार की लोकसभेची पुनरावृत्ती होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने विधानसभेत 'एकला चलो रे'ची भूमिका (Vidhan Sabha Election 2024) घेतलीय. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय, परंतु अजून मतदानाची तारीख, मतमोजणी केव्हा होणार? हे निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही.
नवी विधनासभा केव्हा अस्तित्वात येणार?
यंदा नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरूवातीला दिवाळी (Maharashtra Politics) आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे मतदान दिवाळी झाल्यानंतर होणार असल्याचं समोर येतंय. तर साधारण १४ किंवा १५ नोव्हेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा मुदत संपते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवी विधनासभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं. परंतु, सणासुदीच्या काळामध्ये निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे कदाचित निवडणुका दिवाळीनंतर होतील, असं सांगितलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.