Assembly Election 2024 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विधानसभेच्या रिंगणात; प्रचाराचा नारळही फोडला, कुणाविरूद्ध लढणार? VIDEO

Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Will Contest In Versova : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात झालीय. आता निवडणुकीच्या रिंगणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे देखील उतरणार असल्याची माहिती मिळतेय.
माजी पोलिस आयुक्त संजय पांडे
Assembly Election 2024Saam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही पुणे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केलीय. वर्सोवा विधानसभेतुन पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी वर्सोवाच्या झुलेलाल मंदीरात नतमस्तक होतं प्रचाराला सुरूवात केलीय. सोशल मीडियावर पोस्ट करत स्वत: संजय पांडे यांनी ही माहिती दिलीय. दरम्यान आता संजय पांडे नेमकं कोणत्या पक्षाकडून लढणार हा प्रश्न समोर येत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विधानसभेच्या रिंगणात

वर्सोवा (Versova) मतदार संघात सध्या भाजपच्या भारती लवेकर या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे लवेकर विरूद्ध पांडे, अशी लढत होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान कुठलाही पक्ष नाही, सोबत कुठलीही पार्टी (Maharashtra Assembly Election 2024) नाही, तरी आम्ही प्रयत्न करू अशी पोस्ट संजय पांडे यांनी फेसबुकवर शेअर केलीय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलीय.

फेसबुक पोस्ट चर्चेत

आपल्या पोस्टमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटलंय की, प्रिय वर्सोवा मतदारांनो. तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. वर्सोव्याला बदल आणि नव्या नेतृत्वाची गरज असल्याचं पांडे यांनी म्हटलंय. मुंबईतील माजी पोलीस आयुक्त म्हणून माझ्या भूमिकेसह सरकारी सेवेतील ३५ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे मला कारभारातील पारदर्शकता, प्रतिसाद आणि सहानुभूती यांचं महत्त्व (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) समजतंय.

मी तुमच्या गरजांना प्राधान्य देण्याचं वचन देतो. तुमच्यासाठी खरोखर कार्य करणारं शासन प्रदान करण्याचं देखील आश्वासन पांडे यांनी दिलंय. वर्सोव्यासाठी एक उज्वल आणि अधिक उत्तरदायी भविष्य घडवू. तुम्हाला प्रथम स्थान देणाऱ्या नेतृत्वाला मत द्या, असं आवाहन संजय पांडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून केलंय.

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे
Chandgad Vidhan Sabha : महायुतीत बंडखोरीचं वारं, मविआचा सावध पवित्रा? गटातटाच्या राजकारणात कोण राखणार चंदगडची 'पाटीलकी'?

प्रचाराला सुरूवात

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वतः याबाबत घोषणा केली. कोणताही पक्ष सोबत नसल्याचं देखील संजय पांडे यांनी स्पष्ट (Mahavikas Aghadi Vs Mahayti) केलंय. दरम्यान, काल त्यांनी व देखील केली आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामध्ये संजय पांडे यांनी अटक देखील झालेली होती.

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे
Vidhan Sabha Election : शिवस्वराज्य यात्रेला ९ ऑगस्टपासून सुरुवात; 'राष्ट्रवादी' लढत असलेल्या त्या ३१ मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात निघणार यात्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com