Sakal Survey 2024: भाजपला 'एकला चलो'चा फायदा होणार का?; 'सकाळ'-'साम'च्या सर्व्हेत जनतेने काय म्हटलंय?, वाचा सविस्तर...

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला महायुतीमध्ये फायदा होईल का? की भाजपला एकला चलोमुळे फायदा होईल? यावर जनेतेने आपली मतं व्यक्त केली आहेत. सकाळ-सामच्या सर्वेक्षणातून नेमकं काय सांगितले आहे ते जाणून घ्या....
Sakal Survey 2024: भाजपला 'एकला चलो'चा फायदा होणार का?; 'सकाळ'-'साम'च्या सर्व्हेत जनतेने काय म्हटलंय?, वाचा सविस्तर...
Mahayuti Saam TV
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही

२०१९ मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मोठी घसरण झाली. त्यापार्श्वभूमीवर सकाळ-सामच्या सर्व्हेत राज्यातील लोकांनी भाजपविषयी मतं मांडली आहेत. ही मतं काय आहेत? महायुतीत भाजपचा फायदा आहे की तोटा? यावरचा हा खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत...

लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. मात्र साम-सकाळच्या सर्व्हेत राज्यातील जनतेने पुन्हा महाविकास आघाडीला कल दिलाय. यात महायुतीची पिछेहाट होत असली तरी सकाळ-सामच्या पक्षनिहाय सर्वेक्षणात महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपला मात्र सर्वात जास्त पसंती असल्याचं समोर आलं आहे.

भाजप स्वतंत्र लढल्यास फायद्यात? या प्रश्नावर जनतेने काय मत मांडले आहे ते आपण पाहणार आहोत. भाजप- 28.5 टक्के, काँग्रेस- 24 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) - 14 टक्के, ठाकरे गट - 11.7 टक्के, शिंदे गट- 6 टक्के, इतर- 5.4 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)- 4.2 टक्के, वंचित बहुजन आघाडी- 1.8 टक्के, मनसे - 1.1 टक्के असे मत व्यक्त केले आहे.

Sakal Survey 2024: भाजपला 'एकला चलो'चा फायदा होणार का?; 'सकाळ'-'साम'च्या सर्व्हेत जनतेने काय म्हटलंय?, वाचा सविस्तर...
Sakal Survey 2024: राष्ट्रवादीसोबत ठाकरेंचं नुकसान? मविआत सर्वाधिक फायदा कोणाला ?; 'सकाळ'-'साम' सर्व्हेचे निष्कर्ष अनेकांची झोप उडवणारे

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर राजकीय बदल झाले आणि राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीची समीकरणं तयार झाले. त्यामुळे महाविकास आघाडीने पक्ष फोडाफोडीचा मुद्दा तापवला आणि लोकसभेत त्याचा फटका महायुतीला बसला. त्यातच २०१९ मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची पिछेहाट झाली. त्यामुळे लोकसभेला झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र या सर्वेक्षणात कोणामुळे भाजपचं नुकसान झालंय ते सांगितलं आहे.

Sakal Survey 2024: भाजपला 'एकला चलो'चा फायदा होणार का?; 'सकाळ'-'साम'च्या सर्व्हेत जनतेने काय म्हटलंय?, वाचा सविस्तर...
Konkan Saam-Sakal Survey : कोकणात मविआला फटका? महायुती पुन्हा बाजी मारणार? VIDEO

मित्रपक्षामुळे भाजपचं नुकसान?

अजित पवारांमुळे नुकसान - 22 टक्के

एकनाथ शिंदेंमुळे नुकसान - 5.5 टक्के

शिंदे-अजितदादांमुळे एकत्रित नुकसान- 19.7 टक्के

भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा फटका- 13.7 टक्के

फोडाफोडीमुळे नुकसान झालं नाही- 13.5 टक्के

कारण सांगता येत नाही- 25.6 टक्के

Sakal Survey 2024: भाजपला 'एकला चलो'चा फायदा होणार का?; 'सकाळ'-'साम'च्या सर्व्हेत जनतेने काय म्हटलंय?, वाचा सविस्तर...
Sakal Election Survey: 2024 ला कुणाचं सरकार? विधानसभेवर महायुतीचा की मविआचा झेंडा? 'साम-सकाळ'च्या सर्व्हेत कल कुणाला?

एकीकडे भाजपच्या फायद्या तोट्याची चर्चा सुरु असतानाच भाजपने एकटं लढावं का? याविषयी लोकांनी आपली मतं व्यक्त केलेत. यामध्ये ४०.४ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे. ३०.५ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर २९.१ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे सांगितले आहे.

एकीकडे महायुतीत समन्वय ठेवण्यासाठी सुरु असलेली कसरत तर दुसरीकडे जागा वाटपाचा मुद्दा यामुळे सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यातच सकाळ-सामच्या सर्व्हेच्या माध्यमातून जनतेनं भाजपला संदेश दिलाय. मात्र जनतेचा आवाज ऐकून भाजप एकला चलोची भूमिका घेणार की महायुती मजबूत करत नवी रणनिती आखणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sakal Survey 2024: भाजपला 'एकला चलो'चा फायदा होणार का?; 'सकाळ'-'साम'च्या सर्व्हेत जनतेने काय म्हटलंय?, वाचा सविस्तर...
Sakal Survey 2024: मविआचा सर्वाधिक फायदा कोणाला, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन ठाकरेंचं नुकसान? सर्वेक्षणातून समोर आली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com