Maharashtra News Live Updates : बाबा सिद्धिकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेला मोठ यश

Maharashtra Marathi News Live Updates : आज रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुका, मविआ सभा, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Baba Siddique : बाबा सिद्धिकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेला मोठ यश

बाबा सिद्धिकी हत्ये प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेला मोठ यश आलं आहे.

फरार असलेला शूटर शिव कुमारला अखेर अटक

मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशवरून केली अटक

मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश STF ची संयुक्त कारवाई झाली आहे.

शिव कुमारसह दोघा जणांना गुन्हे शाखेने केली अटक

उत्तर प्रदेशच्या बेहाराईच वरून करण्यात आली अटक

शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या होता तय्यारीत

Dhananjay Mahadik : खासदार धंनजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल

खासदार धंनजय महाडिक यांना वादग्रस्त विधान भोवले.

जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धनंजय महाडिक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

बी एन एस कलम 171 (2) अ प्रमाणे गुन्हा दाखल

भरारी पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

लाडकी बहीण योजनेचे शासनाचे 1500 रुपये घेऊन काँग्रेस रॅलीमध्ये दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून द्या, आम्ही व्यवस्था करतो, असा धमकीवजा इशारा दिल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे.

kalyan News : कल्याणमध्ये एटीएम व्हॅनमध्ये आढळली एक कोटी रुपयांची रोकड

कल्याण गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकाकडून वाहन तपासणी दरम्यान एका एटीएम व्हॅन मध्ये एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे.

एकूण रक्कम एक कोटी वीस लाख असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या रक्कमेमध्ये तफावत आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी व्हॅन ताब्यात घेतली आहे

व्हॅन मध्ये असलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता व्हॅन मधील कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तर दिली नसल्याने व्हॅन ची चौकशी आणि रक्कमेची जुळवाजुळव सुरू आहे सर्व रक्कम आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे

Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांना लाडक्या बहिणींचं वक्तव्य भोवणार

खासदार धनंजय महाडिक यांना लाडक्या बहिणींचं वक्तव्य भोवणार

राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी काँग्रेसच्या महिला दाखल

यापूर्वी निवडणूक आयोगाकडून ही महाडिक यांना बजावली होती नोटीस

Hingoli Accident : हिंगोलीत भीषण अपघातात तिघांचा मृत्यू 

हिंगोलीतील भीषण अपघातात पती पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू

हिंगोली परभणी रस्त्यावरील असोला पाटीजवळ घडली अपघाताची घटना

दुचाकी ट्रॅक्टर अपघात

Maharashtra Politics : छत्रपती मालोजीराजे आणि मधुरिमा राजे छत्रपती पुन्हा सक्रिय

छत्रपती मालोजीराजे व मधुरिमा राजे छत्रपती पुन्हा सक्रिय

काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार

कार्यकर्ता मेळाव्यात घेतला निर्णय

छत्रपती मालोजीराजे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील होते

Mumbai Crime : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोट्यवधी सोन्याची पेस्ट जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २.६७ कोटी रुपयांच्या सोन्याची पेस्ट जप्त

महिलेसह ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्याला अटक

गोपनीय माहितीच्या आधारावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (DRI) कारवाई

तब्बल ३.३५० किलो सोन्याची पेस्ट जप्त

परदेशातून तस्करी करून आणलेलं सोन ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्याने विमानाच्या कचऱ्याच्या डब्ब्यातून काढून महिलेच्या स्वाधीन केल्याच तपासात उघड

Amravati News : अमरावतीत खेळण्याच्या मार्केटला लागली आग

अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोरील खेळण्याच्या मार्केटला लागली आग

आगीमध्ये खेळण्याचे तीन दुकान जळून खाक

लाखो रुपयाचे व्यापाऱ्यांचे नुकसान

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू

Beed : बीडमध्ये महायुतीवर नाराज असलेली रिपाई डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठिशी

बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी रिपाईचे महायुतीत नाराज असणारे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांची भेट घेतलीय.. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या विषयावर चर्चा देखील केली असून आता पप्पू कागदे यांनी बीड विधानसभा मतदारसंघात रिपाईची ताकद योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिलीय. यावेळी रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय झाडी, काय डोंगर, गुहावटीला मोजत बसा; उद्धव ठाकरेंचा शहाजी बापूंना टोला

उद्धव ठाकरे भाषण

* दिपक आबा आमदार झाल्यानंतर निवेदन घेणार

* आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी गुवाहाटीचे रेल्वेचे तिकीट बुक करा

* तिकडे काय झाडी काय डोंगर बघुद्या त्याला

* आयुष्याची राखरांगोळी केली

* गद्दारांना गाड्याला आलोय त्यांचा माज उतरवायला आलोय

* महाराष्ट्र कधीही क्षमा करत नाही

* रायगडाचे टकमक टोक बघितलं नाही, कडेलोट करतील.

Ajit Pawar : अजित पवार यांची पुरंदरमधील सभा रद्द

अजित पवार यांची पुरंदर मधील सभा रद्द झाली आहे.

अजित पवार मुळशीहुन थेट मुंबईकडे रवाना होणार

पुरंदर मध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत

अजित पवारांची सभा रद्द झाल्यामुळे पुंरदरमध्ये राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Election : विजय वडेट्टीवार यांचा धनंजय महाडिक यांच्यावर हल्लाबोल 

भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा समाचार आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला.

भाजप आपल्या खिशातून राज्यातील महिलांना पैसे देत आहेत का? महिलांना धमकावत आहे? महिलांची सुरक्षा महत्वाची आहे.

Maharashtra Election : भाजप खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाकडून नोटीस

भाजप खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाने नोटीस पाठवली आहे.

राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने घेतला आक्षेप

धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने घेतला आक्षेप

2023 चे कलम 179 अन्वेय आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बजावली नोटीस

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोल्हापुरात मोठी कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोल्हापुरात मोठी कारवाई

रंकाळा तलाव परिसरात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणार वाहन पकडले

9 लाख 78 हजार रुपयांच्या दारूसह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाची कामगिरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटातील प्रसाद नराम यास केली अटक

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा दाखल

Maharashtra Election : महायुतीच्या नेत्यांच्या अमित शहांसोबत बंद दाराआड चर्चा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा

चौघांमध्ये १५-२० मिनिटं बैठकीत चर्चा झाल्याची माहिती

अमित शाहांकडून महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेतल्याची सूत्रांची माहिती

विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या

Mumbai News: भास्कर परब यांनी सुनील प्रभू यांच्या एकनिष्ठतेवर उपस्थित केले प्रश्न

मनसे उमेदवार भास्कर परब यांनी सुनील प्रभू यांच्या एकनिष्ठतेवर उपस्थित केले प्रश्न.

मनसेचे दिंडोशी मतदारसंघाचे उमेदवार भास्कर परब यांचा सुनील प्रभू यांच्यावर हल्लाबोल..

जरी आज ते निष्ठावा निष्ठावान बोंबलत आहे तरी त्यांची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या बंडा पासून संशयास्पद राहिली आहे.

आता जरी ते मूळ पक्षात राहिले असले तरी निवडणुकीनंतर ते त्या पक्षात राहणार की नाही याची खात्री नाही.

यांच्या विरोधात भास्कर परब हा राज ठाकरेंचा निष्ठावान तुमच्यासमोर उभा आहे.

पक्ष बदलायचा विचार ज्या वेळी मनात येईल तेव्हा भास्कर परब राजकारणातून बाद झालेला असेल,जो पर्यंत राजकारणात असेल तोपर्यंत फक्त राज साहेबांसोबत असेल बाकी कुठेही दिसणार नाही.

Nandurbar News: अजित पवार उद्या  नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

महायुतीचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारासाठी उद्या अजित पवार नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात घेणार अजित पवार सभा

भरत गावित यांच्या वतीने सभेची जय्यत तयारीला वेग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार भव्य सभा

10 हजार लोक बसतील एवढ्या क्षमतेच्या भव्य सभा मंडपाची बांधणी अंतिम टप्प्यात

Maharashtra News Live Updates:मनसेचा यामिनी जाधव यांना पाठिंबा

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिलाय. भायखळामध्ये यामिनी जाधव यांना मनसेनं पाठिंबा दिलाय.

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचा जतमध्ये भाजपला पाठिंबा!

 युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन जत मतदारसंघात पाठिंबा देत असल्याचे केलं जाहीर.

महाविकास आघाडीच्या जाहीरनामांमध्ये भविष्यातील 5 महत्त्वाचे मुद्दे

निरोगी महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, सर्व समावेश महाराष्ट्र आणि सशक्त नागरी महाराष्ट्र या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्थान देण्यात आलेले आहे. तर पहिल्या 100 दिवसात करण्यात येणाऱ्या योजनांचा आणि उपाय योजनांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे..

महालक्ष्मी अंतर्गत महिलांना प्रतिमा 3000 रुपये देणार,

महिलांना बस प्रवास मोफत करणार,

स्वयंपाकाचे 6 गॅस सिलेंडर प्रत्येकी 500 रुपये उपलब्ध करणार,

महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणार

महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, युवक शिक्षण,आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय, जनतेच्या हितासाठी, शहर विकास, सुशासन, महाराष्ट्राचा स्वाभिमान या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेला आहे

Maharashtra News Live Updates: भाजप उमेदवार संतोष दानवे यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट

रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी रात्री एक वाजता मनोज जरांगे यांची भेट घेतली, अंतरवली मध्ये जाऊन संतोष दानवे यांनी मनोज जरांगे यांचा सत्कार देखील केलाय. संतोष दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असून रात्री उशिरा अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली..चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही.

Maharashtra Marathi News Live Updates :  श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का

श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का

सुनील तटकरे यांचे निकटवर्ती श्याम भोकरे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात

रायगड जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते श्याम भाऊ भोकरे यांनी दिला पदाचा राजीनामा

14 नोव्हेंबरला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती

श्रीवर्धन तालुक्यातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून श्याम भोकरे यांनी अजित पवार गटाचा दिला राजीनामा

Manoj Jarnage : मनोज जरांगेंचादहा दिवसांत १७ जिल्ह्यांचा दौरा

मनोज जरांगे पाटील हे 17 जिल्ह्याचा दौरा येत्या दहा दिवसात करणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये गावागावांमध्ये बैठका घेतील, चर्चा करतील. या दौऱ्यात केवळ आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी करणार आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मात्र गावागावातला जिल्हा जिल्ह्यातला त्यांच्या भेटी ही आता कुणाला पाडणार याची चर्चा सुरू झालीय.

Amit Shah Live : अमित शाह यांचा ठाकरेंना सवाल

सावरकरांवर राहुल गांधी चांगले बोलतील का? अमित शाह यांचा ठाकरेंना सवाल

Akola News : जय मालोकर याचा मोठा भावाला जिवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी आणि मनसेच्या राड्यानंतर मृत्यू झालेल्या मनसे सैनिक जय मालोकर याचा मोठा भावाला जिवे मारण्याची धमकी आलीये.. विजय मालोकार काल मध्यरात्रीनंतर 3 ते 4 लोकांकडून जिवे ठार मारण्याची धमकी मिळाली.. विजय मालोकार हा अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहे.. विजयने आपला निवडणूक प्रचार थांबावा, अन्यथा ठार मारू, अशी धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्यांनी विजय मालोकार यांच्या नातेवाईकाला मारहाण केलीए.. यासंदर्भात त्यांनी सिव्हिल लाईन पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली.

Maharashtra Marathi News Live Updates : शिंदेंच्या विजय शिवतारेंच्या विरोधात अजित पवारांची आज सभा

एकनाथ शिंदे यांच्या विजय शिवतारेंच्या विरोधात अजित पवारांची आज सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार पुरंदरमध्ये सभा घेणार आहेत. अजित पवार शिवतारेंच्या विरोधात काय बोलणार याकडे लक्ष लागलेय.

Maharashtra Marathi News Live Updates : खासदार झालेले बजरंग सोनवणे भाषण करताना वेगळेच बोलले

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलताना आपण आदरणीय जंरांगे पाटील यांच्यामुळेच आमदार झाल्याचे म्हटले होते.. भाषण करताना ओघात असे ते बोलून गेले परंतु आता यावरून बजरंग सोनवणे यांना सोशल मीडियातून ट्रोल केले जात असून बजरंग सोनवणे हे खासदार झालेले असताना जरांगे पाटील यांनी मला आमदार केल्याचे म्हटल्याने, याची जोरदार चर्चा होत असून हा व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे..

Maharashtra Marathi News Live Updates :  मविआ आज जाहीर करणार महाराष्ट्रनामा नावाने जाहीरनामा

मविआ आज जाहीर करणार महाराष्ट्रनामा नावाने जाहीरनामा

या जाहिरनाम्यातून मविआ जाहिर कारणार सरकारच्या पुढील 100 दिवसांचा रोडमॅप

सरकार आल्यानंतर सुरुवातीला पाच गॅरंटी पूर्ण करण्याकडे असणार लक्ष

या जाहिरनाम्यातून मविआचं टार्गेट 2029 विधानसभा निवडणूक

Manoj jarange News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगे

ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला आणा. संभ्रम आहे असे सांगितले जात आहे. संभ्रम नकोच.काय करायचे आणि काय करायचं याबाबत संभ्रम निर्माण केले जात आहेत.

Pune Crime : हडपसर विधानसभेचे उमेदवारावर हल्ला

बेकायदा बांधकामांना विरोध करणाऱ्या हडपसर विधानसभा उमेदवारावर पुण्यात हल्ला करण्यात आला.प्रहार पक्षाकडून हडपसर मतदारसंघातून आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला पुण्यात अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांविरोधात आवाज उठवल्याबद्दल पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली.

सरकार कोणाच्या बापाचे नाही, संजय मंडलिकेने किती पक्ष बदलले याचा इतिहास पाहिला पाहिजे
संजय राऊत, शिवसेना(UBT)

Maharashtra News Live Updates: कार्तिकीसाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्तिक यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठल दर्शनासाठी तीन किलोमीटर पर्यंत रांग गेली आहे. गोपाळपूर रोडवरील जवळपास सहा पत्र शेड भाविकांनी भरले आहेत.

यंदा मोठ्या संख्येने भाविक कार्तिकी साठी येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, चहा,नाश्ता ,जेवण आधी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पंखे कुलरची व्यवस्था केलेली आहे. 12 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे .पंढरपुरात सध्या लाखो भाविक दाखल झाले असून विठू नामाच्या गजराने पंढरी नगरी अवघे दुमदुमून गेली आहे.

Washim News Live : वयोवृद्ध आणि चालता न येणाऱ्या दिव्यांग अश्या 1,381 मतदारांनी बजावला घरून मतदानाचा हक्क

वाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात मागील दोन दिवसांपासून गृह मतदान प्रक्रिया सुरू असून यासाठी नोंदणी केलेल्या 1454 मतदारांपैकी आतापर्यंत 1381 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध आणि चालता न येणाऱ्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणे अशक्य होते. परिणामी, ते मतदानापासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने प्रशासनाला अशा मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

pune : आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी मैदानात

महायुतीचे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांची प्रचार पदयात्रा वानवडी गावठाण वानवडी बाजार फातिमानगर जांभुळकर नगर आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये झाली. या प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. संरक्षणासाठी हा भाऊ तुमच्या बरोबर खंबीर उभा असून लाडकी बहीण योजना पाच वर्षे चालू ठेवू असा जमलेल्या लाडक्या बहिणींना विश्वास दिला,या पदयात्रेला जमलेल्या प्रचंड गर्दीवरून असे लक्षात केलेलं कामांची ही पावती असल्याचे यावेळी सांगण्यात आलं.

Pune News : पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सवलत

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पूना होटेलियर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या ७४ हॉटेल्समध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या देयकावर २० व २१ नोव्हेंबर रोजी १० टक्के सूट देण्यात येणार

Maharashtra News Live Updates: सोलापूरमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेसच्या 5 माजी नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर शहर मध्यची जागा मोची समाजाला नदिल्याने घेतला निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 5 माजी नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com