गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! शिक्षण ते नोकरीपर्यंत मिळणार 50 कोटींची मदत

Parshuram Economic Development Corporation: महाराष्ट्रातील गरीब ब्राह्मण कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! परशुराम आर्थिक विकास महामंडळाला 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शिक्षण, नोकरी आणि उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत व कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
POOR BRAHMIN STUDENTS TO GET ₹50 CRORE SUPPORT FOR EDUCATION
POOR BRAHMIN STUDENTS TO GET ₹50 CRORE SUPPORT FOR EDUCATIONsaam tv
Published On

विशाल शिंदे, साम टीव्ही

परभणी: परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना राज्य सरकारने राज्यातील गरीब ब्राह्मण कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयी सुविधा मिळवून देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाला 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

POOR BRAHMIN STUDENTS TO GET ₹50 CRORE SUPPORT FOR EDUCATION
पद्मश्री प्रतापराव पवारांच्या योगदानाचा गौरव; १५ ऑगस्टला होणार कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचं उद्धघाटन

या निधीच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब ब्राह्मण कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी मदत केली जाणार आहे. अशा दुर्बल ब्राह्मण घटकांना न्याय देण्याचे काम हे महामंडळ करणार आहेत. त्याचबरोबर ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना देखील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. उद्योगासाठी आतापर्यंत तब्बल 60 ते 65 अर्ज आले असून त्यापैकी 12 ते 13 जणांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

POOR BRAHMIN STUDENTS TO GET ₹50 CRORE SUPPORT FOR EDUCATION
Maharashtra Cabinet : मुद्रांक शुल्कात मोठी सूट, फडणवीस सरकारनं घेतले ८ धडक निर्णय, वाचा एका क्लिकवर

ब्राह्मण समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी हे महामंडळ काम करणार आहे. यासाठी राज्यातील सर्वच ब्राह्मण संघटनांकडून आम्ही सूचना घेत आहोत त्यांच्याशी संवाद साधत आहोत आणि सर्वांशी संवाद साधल्यानंतर आणखी अजून काय करता येईल यासंदर्भात देखील आम्ही प्रयत्न करणार असल्याचे कॅप्टन आशिष दामले म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com