Maharashtra News: परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी, हजारो हेक्टर शेतीचं नुकसान; वाचा जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Rainfall Update: राज्याला परतीच्या पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतपिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.
Maharashtra News: परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी, हजारो हेक्टर शेतीचं नुकसान; वाचा जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Rainfall UpdateSaam Tv
Published On

राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावासाने मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आला आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यामध्ये अक्षरश: पाणी आले आहे. अशामध्ये लवकरात लवकर शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान होत आहे. २४ आणि २५ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांतील ३२९९७.३० हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे. सोयाबीन पिकाचे जास्त नुकसान झालं आहे. परतीच्या पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

Maharashtra News: परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी, हजारो हेक्टर शेतीचं नुकसान; वाचा जिल्हानिहाय आकडेवारी
IMD Rain Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर कोसळणार पाऊस; छत्रपती संभाजीनगरसह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बीडमध्ये ८ हजार हेक्टर, धाराशिवमध्ये ७ हजार हेक्टर, नांदेडमध्ये ५ हजार हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ५०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यानंतर सांगली जिल्ह्यात नुकसानीची तीव्रता जास्त आहे. सांगलीत ४ हजार ८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापुरात ३ हजार २०० हेक्टर, पुण्यात ४३० हेक्टर, अहमदनगरमध्ये ९१६ हेक्टर, जळगावात ३१७ हेक्टर, नाशिकमध्ये २५ हेक्टर, धुळ्यात १ हजार ७० हेक्टर आणि पालघरमध्ये ५५.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अशामध्ये सरकारने लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांची पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

Maharashtra News: परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी, हजारो हेक्टर शेतीचं नुकसान; वाचा जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Rain Update : क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा धुवांधार, राज्यभरात मुसळधार, बळीराजा चिंतेत; आज कुठे काय परिस्थिती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com