Maharashtra Rain Update : क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा धुवांधार, राज्यभरात मुसळधार, बळीराजा चिंतेत; आज कुठे काय परिस्थिती?

Maharashtra Weather Update : राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज देखील राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Rain Update : क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा धुवांधार, राज्यभरात मुसळधार, बळीराजा चिंतेत; आज कुठे काय परिस्थिती?
Rain News in MaharashtraSaam TV
Published On

मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्याला परतीच्या पावासाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे एकीकडे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत वर्षभरासाठीचे पाणी टेन्शन मिटले. पण दुसरीकडे परतीच्या पावसामुळे शेताचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. परतीच्या पावसामुळे आलेल्या पूरामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी परतीचा पाऊस सुरू आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. राज्यात पुढचे २४ तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवानह प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई-ठाणे-नवी मुंबई -

मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईसह याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईत सध्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. सध्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. तर कल्याणमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात पाणी साचले होते. अवघ्या दीड दोन तास कोसळलेल्या पावसामुळे कल्याण स्टेशन परिसरात केडीएमसीच्या पार्किंग इमारतीसमोरील रस्त्यावर पाणी साचले. सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांना स्टेशन गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागलो. रिक्षाचालक, वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला.

पालघर -

पालघरमध्ये पहाटेच्या पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम आहे. डहाणू , बोर्डी, बोईसर, पालघर , तलासरी आणि विक्रमगड परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पिंकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत.

पुणे -

सलग चौथ्या दिवशी पुणे शहरात पाऊस पडत आहे. शहरातील अनेक भागात संततधार पाऊस पडत आहे. आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होतं. गेले तीन दिवसांपासून पुण्यात पाऊसाने हाहाकार केलाय. आज दिवसभर शहरात दोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Update : क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा धुवांधार, राज्यभरात मुसळधार, बळीराजा चिंतेत; आज कुठे काय परिस्थिती?
IMD Rain Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर कोसळणार पाऊस; छत्रपती संभाजीनगरसह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

नाशिक -

नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे. सततच्या होत असलेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यावर पाणी साचले आहे. गंगापूर धरणातून देखील कालपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून सध्या गोदावरीत ११०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत देखील काहीशी वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

धुळे -

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रामध्ये करण्यात येत आहे विसर्ग अक्कलवाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आणि त्यामुळेच प्रशासनातर्फे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे ७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून धरणातून ८१२३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग पांझरा नदीपात्रात केला जात आहे. त्यामुळे नदी काठावरील सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. तर धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील कर्ले या गावात रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर भिकन देवरे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात कपाशीची शेती शेजारच्या नाल्यात धसल्याने वाहून गेली.

धाराशिव -

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे सोयाबीन पिकाचे झाले असून बहुतांश भागात पशुधन आणि घरांचे देखील नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना पालकमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून, सुक्ष्म नियोजनासह त्वरीत मदत पोहचवावी अशा सूचना सावंतांनी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांना दिल्या आहेत.

Maharashtra Rain Update : क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा धुवांधार, राज्यभरात मुसळधार, बळीराजा चिंतेत; आज कुठे काय परिस्थिती?
Latur Rain: लातूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, काँग्रेस आमदारांची मागणी

सांगली -

सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. अति मुसळधार पाऊस पूर्व भागात झाला असून यामुळे दुष्काळी तालुक्यातील बोर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तालुक्यातील हळळी-बालगाव दरम्यान असणाऱ्या विजापूर मार्गावरील पूल नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे विजापूर-उमदी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र दुष्काळी तालुक्यातील बोर नदी सध्या परतीच्या पावसामुळे दुथडी भरून वाहू लागल्याने दुष्काळग्रस्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यवतमाळ -

यवतमाळ जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडल्याची नोंद करण्यात आली असून यामुळे जलाशय तुडुंब भरले आहेत. यामुळे रब्बीच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. कमी वेळात अधिक प्रमाणात बरसणार्‍या पावसाने मोठ्या प्रमाणात शेत शिवाराचे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले असून जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

जालना -

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात जोरदार पावसाने झोडपून काढलं होतं. यामुळे खरिपाच्या पिकांसह फळबागाचं मोठं नुकसान झालं होतं. महसूल आणि कृषी विभागाकड्रून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला असून हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जवळपास ४३९ कोटीची मागणी या अहवालात करण्यात आलीय.

भंडारा -

भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून काल दुपारपासून जिल्ह्यात संततधार पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. तर भंडारा जिल्हातील तुमसर शहरात पावसाचं पाणी मुख्य चौकात साचले आहे. तर रस्त्यावरून गुडघाभर पाणी साचलं आहे. दर पावसाळ्यात जुना बस स्थानक चौक येथे पाणी साचत असते तरी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्याआधी उपाययोजना केल्या जात नाही. नगरपालिकेने केलेल्या नालेसफाईचा फज्जा उडाला. तुमसर शहरातील ठिकठिकाणचे नाले, तसेच लहान-मोठ्या गटारी तुंबल्या असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे.

Maharashtra Rain Update : क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा धुवांधार, राज्यभरात मुसळधार, बळीराजा चिंतेत; आज कुठे काय परिस्थिती?
Mumbai Rain : 'इतकं भयानक चित्र कधीही पाहिलं नव्हतं'; आदित्य ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com