महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Maharani Tararani Jain Controversy Full Statement: महाराणी ताराराणी जैन समाजाच्या असल्याच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. जैन आचार्य नयन पद्मसागर यांच्या विधानावर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
Controversy erupts after a Jain monk claims Maharani Tararani belonged to the Jain community, triggering sharp reactions from historians and political figures.
Controversy erupts after a Jain monk claims Maharani Tararani belonged to the Jain community, triggering sharp reactions from historians and political figures.Saam Tv
Published On

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला असून महाराणी ताराराणी या जैन समूदायच्या असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असे वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केले. मुंबईतील जैन समूदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्याने आता इंद्रजीत सावंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Controversy erupts after a Jain monk claims Maharani Tararani belonged to the Jain community, triggering sharp reactions from historians and political figures.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

इंद्रजीत सावंत म्हणाले, महाराणी ताराराणी या शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आहेत. स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या आहेत. शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत. ताराराणी साहेब या मराठा आहेत. या बदल कोणाचेही दुमत असता कामा नये. कारण या संदर्भात शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी महाराज या आपल्याच समाजात जन्माला याव्यात असं जगातल्या सर्वच लोकांना वाटतं.

Controversy erupts after a Jain monk claims Maharani Tararani belonged to the Jain community, triggering sharp reactions from historians and political figures.
Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

मात्र असं असलं तरी देखील त्यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना इतिहासाची माहिती घेणे तितकंच गरजेचं आहे. सध्या एका जैन मुनि यांनी ताराराणी या जैन असल्याचे वक्तव्य केलंय. जो जैन समाज शांततेसाठी आणि अहिंसेसाठी ओळखला जातो. त्या समाजातील प्रमुखांनी असं वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये असं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी सांगितले. मराठा इतिहासाची मोडतोड करण्याचं एक षडयंत्र सुरू आहे. या षडयंत्रचा एक भाग या आचार्य मुनीनी होऊ नये असं मला वाटतं. महाराष्ट्र अशा पद्धतीचे वक्तव्य कधीही सहन करणार नाही त्यामुळे या आचार्याने हे समजून घेतलं पाहिजे असंही इंद्रजीत सावंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com