सेल्फीच्या नादात खोल दरीमध्ये पडलेल्या युवकाला जीवनदान

कास रस्त्यावर गणेश खिंड परिसरातील खोल दरी लगत असणाऱ्या कठड्यावरून सेल्फी काढताना तोल जाऊन तब्बल आठशे फूट खोल दरी मध्ये पडलेल्या एका युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या टीमला यश आले आहे.
सेल्फीच्या नादात खोल दरीमध्ये पडलेल्या युवकाला जीवनदान
सेल्फीच्या नादात खोल दरीमध्ये पडलेल्या युवकाला जीवनदानओंकार कदम
Published On: 

ओंकार कदम

सातारा - कास रस्त्यावर गणेश खिंड Ganesh Khind परिसरातील खोल दरी लगत असणाऱ्या कठड्यावरून सेल्फी काढताना तोल जाऊन तब्बल आठशे फूट खोल दरी मध्ये पडलेल्या एका युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या टीमला यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कास भागात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. काही पर्यटकांना उत्साहाच्या भरात आपण काय करत आहोत याचे भान रहात नाही. याचा अनेकवेळा अनुभव आला आहे.

हे देखील पहा -

पोलीस Police प्रशासना कडून वेळोवेळी सर्व खबरदारी घेतली जाते परंतु काही उत्साही पर्यटक पोलिसांचा डोळा चुकवून सध्या कास परिसरात फिरायला जात आहेत.आशा ठिकाणी आल्यानंतर अनेकांना फोटो,सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही अशाच कास पठारावर फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा एक सेल्फी जीवावर बेतला असता.

सेल्फीच्या नादात खोल दरीमध्ये पडलेल्या युवकाला जीवनदान
ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या कारवाई विरोधात शेतकरी आक्रमक...

केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच हा युवक 24 तास दरी मधे पडला असताना सुद्धा सुखरूप आहे.जेव्हा हा युवक दरीत पडला असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली तेव्हा पोलिसांनी शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या टीमला मदतीसाठी बोलावले. त्यांनी तब्बल 24 तासांच्या प्रयत्ना नंतर या युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या अपघातातील जखमी युवकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पुढील उपचार सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com