

तबरेज शेख
Nashik News: नाशिकमध्ये बिबट्याचा नागरिकांवर हल्ले सुरुच आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मेंढी गावाजवळ एका 17 वर्षीय युवकांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज शुक्रवारी पहाटे 6 वाजण्याच्या बिबट्याने युवकावर हल्ला केला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मेंढी गावाजवळ १७ वर्षीय तरुणावर बिबट्या हल्ला करत जखमी केले आहे. बिबट्याने हल्ला करत पाठ आणि डोक्यावर बिबट्याने पंजा मारला. त्यानंतर या जखमी तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृष्णा सोमनाथ गीते असे बिबट्याने हल्ला केलेल्या १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
कृष्णा हा सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात कामासाठी जात होता. यावेळी रस्त्यातच कृष्णावर या बिबट्याने पाठीमागून झडप मारली. कृष्णाला बिबट्याचे दात डोक्याला आणि पाठीला लागले. त्यात कृष्णाची आणि बिबट्याची काही वेळ झटापट झाली. यात बिबट्याला त्याने जोरदार धक्का दिला.
यात बिबट्या बाजूला पडला आणि त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी धावले. यामुळे थोडक्यातच कृष्णाचा जीव वाचला आहे. आजूबाजूचे लोक येताना दिसतात बिबट्याने शेतात धूम ठोकली, असं स्वतः कृष्णाने बोलताना सांगितलं आहे.
नाशिकमध्ये तरुणावर अचानक बिबट्याने मारली झडप
नाशिकच्या गुलमोहर कॉलनी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका तरुणावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. रविवारी ही घटना घडला. या घटनेत तरुणाच्या पायाला दुखापत झाली आहे. तर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नाशिकमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाचे पथक मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.