- चेतन व्यास
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धेच्या (wardha local crime branch) अशोकनगर परिसरातून चार तलवारी अन् पाच फरसे घेऊन वाहतूक करणाऱ्या एकास बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा पाेलिस शाेध घेताहेत. शैलेश धर्मा नाडे (२४, रा. अशोक नगर) असे अटक केलेल्याचे नाव असून राजा लोंढे या पोलिस शाेध घेताहेत. दरम्यान मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याने वर्धा शहरात चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. (Maharashtra News)
वर्धा शहरात गुन्हे शाखेची पथके गुन्हेगारांची तपासणी तसेच अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. दरम्यान त्यांना दोन व्यक्ती लाल रंगाच्या दुचाकीवर शस्त्रसाठा बाळगून बोरगाव येथून अशोकनगर परिसरात जात असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून दोघांवर छापा मारला असता शैलेश नाडे हा पोलिसांच्या गळाला लागला तर राजा लोंढे हा पोलिसांच्या तावडीतून निसटला. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता चार मोठ्या लोखंडी तलवारी, पाच मोठे फरसे, जुनी दुचाकी असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत बेड्या ठोकल्या. शैलेश नाडे याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले तर फरार राजा लोंढे याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी अलर्ट राहणे गरजेचे
आगामी सण-उत्सव पाहता आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी वेळीच कारवाई करीत आरोपींना जेरबंद करुन संवेदनशील गुन्हा करण्याचा डाव उधळून लावला. मात्र पुढील काळात पोलिसांनी आणखी अलर्ट राहणे गरजेचे आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उलटसुलट चर्चेला उधाण
नऊ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास अशोकनगर परिसरात दोन गटात राडा होत वाद उफाळला होता. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटावर दंगा भडकविण्याबाबत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून शांतता व सुव्यवस्था राखून सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेत सामाजिक सलाेखा राखण्याची विनंती केली होती; मात्र सात दिवसानंतर त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.