संदीप भाेसले
मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणाचा आज (शनिवार) 8 वा दिवस आहे. जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाला लातूर येथील सकल मराठा समाजाने पाठिंबा देत शुक्रवारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदाेलन केले. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लातूर (Latur Bus Stand) जिल्ह्यातून बाहेरगावी जाणा-या एसटी बसच्या फे-या सलग दुस-या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)
लातूर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात तसेच तालुक्यात धावणाऱ्या बस रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दुसरकीडे खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे.
लातूर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड ,धाराशिव, परभणी, नांदेड या मार्गावरील बसच्या फेऱ्या आजही (शनिवार) पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनाच्या मदतीने प्रवास करावा लागत आहे. शुक्रवारी एसटीच्या फे-या रद्द झाल्याने लातूर विभागाचे 11 लाख 28 हजार 768 रुपये इतके नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली.
दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आज सकाळी एसटी महामंडळाची एक बस थांबवून प्रवाशांना बसमधून खाली उतरवत रिकामी बस डेपोत परत पाठवली. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरच्या पळशी फाटा इथे मराठा समाजातील तरुणांनी बस अडवत घोषणा दिल्या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.