Konkan News : 'थ्रिप्स'मुळे आंबा, काजू उत्पादक चिंतेत, बोगस कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शेतक-यांची मागणी

वेंगुर्ल, मालवण, कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली आदी भागातही थ्रिप्स रोग झपाट्याने वाढत असल्याने बागायती शेतीवर त्याचा परिणाम जाणवत आहे.
Sindhudurg
Sindhudurgsaam tv
Published On

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील फळबागायतदार आंबा (mango) आणि काजूवर (cashew) हाेणा-या थ्रिप्स (thrips) रोगामुळे हवालदिल झाले आहेत. काजू, आंबा, कोकम व इतर बागायती शेतींना या रोगाची व्याप्ती वाढल्याने हातातोंडाशी आलेले बागायती पीक वाया जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Maharashtra News)

यावर्षी देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण कलमांपैकी सुमारे ७० ते ८० टक्के कलमे मोहोराने भरली आहेत. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये आलेल्या मोहोरावरती थ्रिप्स या रोगाने थैमान घातले आहे. बोगस कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी शेतकरी मागणी करत आहेत.

Sindhudurg
वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा राज्य सरकारला 5 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम

देवगड तालुक्यातील आंबा कलम मोहरा वरती थ्रिप्स या कीटकाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून या थ्रीप्स रोगामुळे यावर्षी आंबा उत्पादन चांगले होणार असे वाटत असतानाच आंबा उत्पन्नात घट झाली आहे.

जानेवारी महिन्यामध्ये आंबा कलमांना प्रचंड मोहोर आला. या मोहरावरती थ्रिप्स या रोगाने थैमान घातले असून मोहोर काळा पडून फळ गळत आहे. तसेच फळ गळून पडण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात होत असून या रोगावर बाजारात व कृषी सेवा केंद्रांमध्ये रु ४००० ते ५००० प्रति लिटर रुपये किमतीची औषधे उपलब्ध आहेत. मात्र महागडी औषधे वापरून देखील या रोगावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी बागायतदार हतबल झाले आहेत.

Sindhudurg
APMC Market Vashi : मुंबईकरांनाे! एपीएमसीत कलिंगडाची आवक वाढली; जाणून घ्या दर

कृषी विभागाने कडक कारवाई करावी

औषधांवर एवढा प्रचंड खर्च करून देखील हा रोग नियंत्रणामुळे येत नसेल तर सगळे औषध कंपन्या सदर औषधे बोगस स्वरूपाची विक्री करत असल्याचा संशय आंबा बागायतदार व्यक्त करीत असून या औषधांची कृषी विभागामार्फत तपासणी करून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंबा बागायतदाराकडून होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृषी विभागाचे या बनावट औषध विक्रीकडे नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या विषयावर बोगस औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी करत आहे. वेंगुर्ल, मालवण, कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली आदी भागातही थ्रिप्स रोग झपाट्याने बागायती शेतीवर पसरत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Sindhudurg
CBSE Board Exam 2024 : शिवजयंती दिनी 'सीबीएसई' ची परिक्षा नकाे, विद्यार्थ्यांना सुटी देण्याची 'मनविसे'ची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com