Ajit Pawar: ५० खोके एकदम ओके म्हटले की त्यांना राग येतो; अजित पवार यांची सरकारवर खोचक टीका

५० खोके एकदम ओके म्हटले की त्यांना राग येतो; अजित पवार यांची सरकारवर खोचक टीका
Ajit Pawar
Ajit PawarSaam tv
Published On: 

लातूर : ५० खोके एकदम ओके असे आम्ही म्हणालो की त्यांना राग येतो. जर त्यांनी काही केले नसेल तर राग का यावा; अशी खोचक टिका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. (Tajya Batmya)

Ajit Pawar
Nashik News: आक्षेपार्ह व्हिडीओ व्‍हायरल करून विनयभंग; स्नॅपचॅटवरील मैत्री अल्पवयीन मुलीला महागात

विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अहमदपुर तालुक्यातल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित नूतन सरपंचाच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी चौफेर टोलेबाजी करत राज्‍य सरकारवर आणि केंद्र सरकारच्या ‘काऊ हग डे’ या नव्या धोरणावर खोचक टिका केली.

गृहखाते, पोलिसांच्‍या कामगिरीवर प्रश्‍नचिन्‍ह

प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची (Latur News) चौकशी करण्यात यावी. या मागचा करविता कोण याचा शोध का घेतला जात नाही. गृहखाते व पोलिस काय करतायेत यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. विरोधात बातमी लिहिणाऱ्या पत्रकाराला मारलं जातंय हे अत्यंत भयानक असून आरोपीला कठोर कारवाई झाली पाहिजे; अशी मागणी ही यावेळी अजित पवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com