Nashik News: आक्षेपार्ह व्हिडीओ व्‍हायरल करून विनयभंग; स्नॅपचॅटवरील मैत्री अल्पवयीन मुलीला महागात

आक्षेपार्ह व्हिडीओ व्‍हायरल करून विनयभंग; स्नॅपचॅटवरील मैत्री अल्पवयीन मुलीला महागात
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तबरेज शेख

नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय शाळकरी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करुन तिचा विनयभंग करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलीस (Police) ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत (Nashik News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एक महिन्‍यात १२ मुलींचे विनयभंगाच्या घटना समोर आले आहे. (Letest Marathi News)

Nashik News
Pune Crime News: बापानेच केला‍ मुलीचा खून; नंतर विषारी द्रव्‍य पिवून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकच्‍या देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला स्नॅपचॅटवरील (Snapchat) मैत्रीच महागात पडली आहे. पीडित मुलीच्या आईने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुलीने स्नॅपचॅटवर आलेली एका अनोळखी इसमाची रिक्वेस्ट शाळेतील मित्र असावा असे समजून (Crime News) स्वीकारली. त्यानंतर ते दोघेही चॅटिंग करत होते. दरम्यान आरोपीने मुलीला धमकावून तिला स्वतःचे आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर ते व्हिडीओ स्नॅपचॅट तसेच इन्स्टाग्रामवर व्हायरल करत मुलीची बदनामी केली.

घडला प्रकार सांगितला पालकांना

संबंधित अल्पवयीन मुलीने जानेवारी महिन्यात स्नॅपचॅट अॅपवर अकाऊंट ओपन केले. त्यावर ती मैत्रिणींसोबत फोटो काढून चॅटिंग करायची. त्यानंतर संशयिताने हे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. ही घटना पीडित मुलीच्या लक्षात येताच तिने आपल्या पालकांना घडलेली हकीकत सांगितली. पालकांनी लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जातो आहे.

महिनाभरा १२ घटना

मोबाईलचा जमाना असल्याने अनेक शाळा, महाविद्यालयांतील मुलां मुलींच्या हातात मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईलच्या वापरामुळे अनेक अनुचित घटना समोर येत आहेत. शाळकरी मुलींना हेरुन अनेक वाईट वृत्तीचे लोक त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्यांना एकांतात आपले आक्षेपार्ह फोटो काढून पाठवण्यास भाग पाडतात. त्याला या शाळकरी मुली अनेकदा बळी पडतात. नाशिकमध्‍ये गेल्‍या महिनाभरात १२ घटना उघडकीस आल्‍या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com