NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तपासासाठी सीबीआयचे पथक लातूरमध्ये

NEET Exam Scam: लातूर नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. या प्रकरणाचा तपास लातूर पोलिसांकडून आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
Latur NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तपासासाठी सीबीआयचे पथक लातूरमध्ये
Latur NEET Paper Leak Case UpdateSaam Tv
Published On

संदीप भोसले, लातूर

नीट पेपरफुटी प्रकरणात (Latur NEET Paper Leak Case) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे (CBI) पथक लातूरमध्ये दाखल झाले आहे. लातूरच्या न्यायालयात सीबीआयचे अधिकारी पोहचले आहेत. पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. या प्रकरणाचा तपास लातूर पोलिसांकडून (Latur Police) सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन जणांना लातूर पोलिसांनी अटक केली आहे. मागच्या सहा दिवसांपासून या दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे त्यासाठी सीबीआयचे पथक लातूरमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला मोठी गती मिळणार असल्याचे देखील दिसत आहे.

Latur NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तपासासाठी सीबीआयचे पथक लातूरमध्ये
NEET Paper Leak Case: NTA चा आणखी एक कारनामा उघड; प्राध्यापकाऐवजी क्रेडिट कार्ड विक्रेत्याला बनवलं निरीक्षक

गेल्या सहा दिवसांच्या पोलिस चौकशीमध्ये दोन्ही आरोपीकडील मोबाईलमधून नवनवीन खुलासे समोर आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. आता सीबीआयच्या तपासातून देखील मोठी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआय देखील या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करणार आहे.

Latur NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तपासासाठी सीबीआयचे पथक लातूरमध्ये
Pune Fake Police VIDEO : क्रिकेट चाहत्यांना मारहाण करणाऱ्या तोतया पोलीसाला फरासखाना पोलीसांनकडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरण फक्त लातूरपुरते मर्यादित राहिले नाही. या प्रकरणाचे लातूरपाठोपाठ धाराशिव आणि बीडमधील कनेक्शन देखील उघडकीस आले होते. बीड जिल्ह्यातील दोन संशयित शिक्षकांचा देखील या प्रकरणात हात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. एक शिक्षक बीडचा तर दुसरा माजलगाव येथील होता. नांदेड एटीएसने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. दोघेही लातूरच्या एका आरोपीचे सब एजन्ट म्हणून काम पाहत होते.

Latur NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तपासासाठी सीबीआयचे पथक लातूरमध्ये
Pune News : पुणे मनपाची सलग चौथ्या दिवशी कारवाई ; अनधिकृत पब अन् हॉटेलवर हातोडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com