संदीप भोसले, लातूर प्रतिनिधी
Latur Municipal Corporation election 2025 full analysis : संपूर्ण राज्याच लक्ष असणारी लातूर महानगरपालिका आहे .. काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. नगरपंचायती नगरपरिषदा जिल्हा परिषद, या निवडणुकीचे आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे. तर महानगरपालिका निवडणुकांसाठी देखील स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार , आणि पक्षीय बांधणीला सुरुवात झाली आहे. लातूर महानगरपालिका ही 25 ऑक्टोबर 2011 रोजी वाढत्या लोकसंख्येनुसार तत्कालीन महाराष्ट्र सरकारने लातूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याचा निर्णय घेतला.. तर सन 2012 सालीच्या महानगरपालिका निवडणुकीत, काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवत एकूण 36 जागांवर दणदणीत विजय मिळवला. मात्र यावेळी भाजपाला खातेही खोलता आले नाही. (BJP vs Congress battle for Latur civic body)
लातूर महानगरपालिका सन 2012 निवडणुकीत कुणाला किती मिळाल्या जागा..
काँग्रेस: - 36
भाजप:- 00
राष्ट्रवादी: - 13
शिवसेना: - 06
अपक्ष: - 02
2012 मधील निवडणुकीत काँग्रेसने लातूर महानगरपालिकेवर आपला विजयाचा झेंडा लावत महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर बसवला. 2012 मधील निवडणुकीत भाजपला महानगरपालिकेत एकही जागा नव्हती, मात्र 2017 च्या निवडणुकीत भाजपाने थेट झिरो वरून हिरो होत लातूर महानगरपालिकेतील सत्ता काबीज केली. आणि भाजपाने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात जवळपास 36 जागा जिंकल्या.
लातूर महानगरपालिका सन 2017 निवडणुकीत कुणाला किती जागा...
एकूण जागा 70
भाजप 36
काँग्रेस 33
राष्ट्रवादी:- 01
शिवसेना:- 00
2017 यावेळी मात्र काँग्रेसने लातूर महानगरपालिकेची सत्ता गमावली. लातूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे पुत्र आमदार अमित देशमुख यांच्याकडे लातूर जिल्हा काँग्रेसचे सूत्र गेली. दरम्यान त्यांच्यात नेतृत्वात लातूर मनपाची निवडणूक लढवण्यात आली मात्र काँग्रेसला आपला गड राखून ठेवता आला नाही, 2017 च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना यावेळी यश आले आणि महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आली . यावेळी ते राज्याचे कामगार मंत्री होते त्यामुळे . तर लातूर जिल्हा परिषद मध्ये देखील अध्यक्ष हा भाजपाचाच झाला. त्याचप्रमाणे लातूर मनपाही संभाजी पाटील निलंगेकर यांनी काटेकोरपणे नियोजन करून ताब्यात घेतली..
भाजपाच्या सत्तेला अडीच वर्ष झाल्या नंतर मात्र काँग्रेसने फोडा फोडीचे राजकारण करुन भाजपाचे नगरसेवक फोडत लातूर महानगर पालिकेत काँग्रेसचा महापौर केला. यामुळे लातूरकरांनी भाजपाले स्पष्ट बहुमत देऊन देखील भाजपाच्या अंतर्गत राजकारणामुळे भाजपाला आपली सत्ता टिकवता आली नाही.
मात्र हे सर्व चित्र स्पष्ट असले तरी यंदा मात्र चित्र बदलली जाणार असल्याचं दिसत आहे, कारण राज्यात झालेल्या महाविकास आघाडी, आणि महायुतीतील पक्षीय फुटाफुटीने, स्थानिक चे चित्र देखील काहीस बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मागच्या दोन टर्म पासून भाजपाकडे गेलेली जागा पुन्हा खेचून आणत लातूर लोकसभेत काँग्रेसचा खासदार झाला.तर विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसला म्हणावी तेवढी ताकद मिळाली नाही.. हक्काची असणारी लातूर ग्रामीण जागा देखील काँग्रेसच्या हातातून गेली..
आता काही दिवसात लातूर महानगरपालिकेचे प्रभाग रचनेनुसार आरक्षण देखील जाहीर होणार आहे. प्रभाग देखील वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सध्या आपापल्या प्रभागात जोरदार तयारीला सुरुवात केली.. आणि यंदाच्या निवडणुकीत देखील तेच प्रश्न समोर येतील, पाणी, रस्ते, नाली, वीज, आरोग्य, त्यामुळे लातूर महानगरपालिकेवर यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि लक्षवेधी ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.