Latur Guwahati Love Story: बंड प्रेमाचं! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी गर्लफ्रेंड थेट गुवाहाटीवरून महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये आली, पण...

Latur Love Story: गुवाहाटी येथे राहणाऱ्या अरुंधती नावाच्या तरुणीची सोशल मीडियाद्वारे एका तरुणाशी ओळख झाली.
Latur Guwahati Love Story
Latur Guwahati Love StorySAAM TV
Published On

Latur News: प्रेमासाठीम (Love) अनेक जण काहीही करायला तयार असतात. अशाच एका तरुणीने आपल्या प्रेमासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास केला आहे. प्रियकराला भेटण्यासाठी या तरुणीने गुवाहाटीवरुन थेट लातूर (Guwahati To Latur) गाठलं. पण ऐवढं करुन देखील या तरुणीला आपल्या प्रियकराला भेटता आले नाही. तिला तसंच आपल्या घरी परत जावे लागले.

Latur Guwahati Love Story
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार; सखल भागात साचले पाणी साचले

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथे राहणाऱ्या अरुंधती नावाच्या तरुणीची सोशल मीडियाद्वारे एका तरुणाशी ओळख झाली. बोलता बोलता त्यांच्यात मैत्री झाली त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अशामध्ये आपल्या प्रेमाला प्रत्यक्षात भेटण्यासाठी या तरुणीने महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला.

अरुंधतीला तर फक्त त्या तरुणाचे नाव आणि तो लातूरमध्ये राहत असल्याचे माहिती होते. याच माहितीच्या आधारे ती त्याला भेटण्यासाठी गुवाहाटीवरुन रेल्वेने मुंबईत आली. त्यानंतर ती लातूर एक्स्प्रेसने लातूरमध्ये पोहचली. या प्रवासादरम्यान तिचा मोबाइल हरवला. पण नशीब अरुंधतीला तिच्या प्रियकराचा नंबर लक्षात होता.

Latur Guwahati Love Story
Zilla Parishad परिसरात वाहन लावताना शिस्त पाळा, अन्यथा टायरची हवा साेडलीच समजा; सीईओंचा नवा प्रयाेग

मोबाइल हरवला त्यामुळे आता प्रियकराला फोन कसा करायचा असा प्रश्न तिला पडला. त्यानंतर तिने काही प्रवाशांकडे मदत मागितली. त्यांच्या मोबाइलवरुन ती प्रियकराला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्याशी काही संपर्क झाला नाही. त्यामुळे थकलेली अरुंधती बसस्थानकावर जाऊन बसली.

Latur Guwahati Love Story
North India Flood Update: उत्तर भारतात आभाळ फाटलं, ५ राज्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत, हिमाचलमध्ये ५४ मृत्यू

बस स्थानकावर एकट्या बसलेल्या मुलाला पाहून तिला मदत करण्यासाठी अनेक जण आले. सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील आणि सय्यद मुस्तफा यांनी तिला गांधी चौक पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर तिला मध्यरात्री दोनच्या सुमारस सखी वन स्टॉप सेंटरला मुक्कामी पाठवले. चार ते पाच दिवस तिला याठिकाणी ठेवण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी अरुंधतीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तिच्या भावाशी पोलिसांचे बोलणे झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला तिकीट काढून पुन्हा गुवाहाटीला रवाना केले. ज्या प्रियकरासाठी अरुंधतीने ऐवढा प्रवास करुन लातूर गाठले त्या प्रियकराशी तिची भेट झाली नाही. त्यामुळे नाराज होत अरुंधतीला पुन्हा गुवाहाटीला जावे लागले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com