North India Flood Update: उत्तर भारतात आभाळ फाटलं, ५ राज्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत, हिमाचलमध्ये ५४ मृत्यू

पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफकडून (Army Jawan) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
North India Flood
North India Flood Saam Tv
Published On

Delhi News: उत्तर भारतामध्ये पावसाचा (North India Rainfall) कहर सुरु आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पूरामुळे (North India Flood) जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

एकट्या हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ (NDRF) आणि लष्कराच्या जवानांकडून (Army Jawan) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या ६ दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचलमध्ये गेल्या २४ तासांत ३९ ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. बियास नदीच्या प्रवाहामुळे अनेक घरं वाहून गेल्या आणि पूल देखील कोसळले आहेत.

North India Flood
Madhya Pradesh Couple News: नवऱ्याच्या शिक्षणासाठी दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी केली; ऑफिसर होताच त्याने पत्नीसोबत केलं लाजिरवाणं कृत्य

गेल्या ७२ तासांत देशांतील विविध राज्यांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 34 जणांचा, हिमाचल प्रदेशमध्ये ५४ जणांचा, जम्मू-काश्मीरमध्ये 15 जणांचा, दिल्लीत 5 जणांचा आणि राजस्थान आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये ९२ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आतपर्यंत ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हिमाचलमधील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

North India Flood
Helicopter Missing In Nepal : माउंट एव्हरेस्टजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता; उड्डाणानंतर अवघ्या १५ मिनिटांत संपर्क तुटला

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये मध्य प्रदेशातील पर्यटकांच्या वाहनांवर दरड कोसळली. या अपघातात इंदूरच्या ४ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत.दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नदीचे पाणी २०६.३२ मीटरने वाहत होते.

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे आलेल्या पूरात उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. बुधवारपर्यंत उत्तरप्रदेशच्या ६५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारकडून मदत आणि सहकार्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com