Madhya Pradesh Couple News: SDM ज्योति मौर्य हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजलं. SDM झाल्यावर ज्योति मौर्य दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचा आरोप, त्यांच्या पतीने केला होता. हे प्रकरण गाजत असतानाच आता अशाच प्रकारचं आणखीन एक प्रकरण समोर आलं आहे. मात्र इथे महिलेऐवजी एका पुरूषाने आपल्या पत्नीला फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑफिसर बनताच त्या पुरूषाने पहिल्या पत्नीला सोडून दुसरा विवाह केल्याचा आरोप करण्यात आला आहे.(Crime News)
नवरा ऑफिसर व्हावा म्हणून पत्नीनं धुणी-भांडी केली, मजुरी केली. सगळं पणाला लावून रात्रंदिवस मेहनत घेतली. नवऱ्याला ऑफिसर केलं. पण खालेल्या मिठाची जाण काही नवऱ्याला ठेवता आली नाही.
कमर्शियल ऑफिसर होताच नवऱ्यानं दुसरं लग्न केलं आणि आपल्या पहिल्या पत्नीला (Wife) दूर लोटलं. कमरू हठीले असं आरोप करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. ममता असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. या दोघांचा साल 2015 मध्ये प्रेम विवाह झाला. कमरू त्यावेळी पदवीधर होता. कमरूला पुढे शिकण्याची तीव्र इच्छा होती. मग काय, कमरूला ऑफिसर करण्याचा ममताने विडाच घेतला. ममताने धुणी-भांडी केली, मजुरी केली. प्रचंड मेहनत घेतली कमरूच्या वह्या पुस्तकांसाठी पैसे जमवले.
2019-20 मध्ये कमरूला यश मिळालं आणि त्याची कमर्शियल टॅक्स ऑफिसर पदासाठी निवड झाली. तो रतलाम जिल्ह्यात तैनात होता. याच दरम्यान, तो जोबट येथील एका तरुणीच्या संपर्कात आला. ममताच्या प्रेमाची जाण न ठेवता कमरूनं ममताला माहेरी पाठवलं आणि दुसऱ्या तरुणीसोबत राहू लागला.
पहिल्या पतीचं निधन झालं
कमरुच्या संपर्कात येण्याआधीचं ममताचं लग्न झालेल होतं. लग्नाच्या अडीच वर्षानंतरच पतीचं निधन झालं. तिचं पहिलं लग्न 16 वर्षांपूर्वी झालं होतं. पतीच्या निधनानंतर ममता कमरूच्या संपर्कात आली. जवळपास सहा वर्ष कमरू आणि ममता एकत्र राहिले.
नोकरी लागल्यावर तो बदलला
पतीच्या (Husband) निधनानंतर ममता सासरीचं राहत होती. कमरू सासरच्यांच नात्यातला होता. पतीच्या निधनानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. कमरू त्यावेळी शिक्षण घेत होता. कमरूला शिकवण्यासाठी ममताने खूप कष्ट केले, पण नोकरी लागल्यावर तो बदलला. ममताच्या मेहनतीची, प्रेमाची जाणीव न ठेवता दुसऱ्या तरुणीच्या संपर्कात आला.
न्याय मिळावा म्हणून ममता आता दारोदारी फिरतेय. देखभालीसाठी दरमहिन्याला 12 हजार रुपये द्यावे अशी मागणी ममताने केलीये. कमरूच्या अवघड काळात ममताने साथ दिली, पण चांगले दिवस येताच कमरू बदलला. तिच्या कष्टाची जाणीव न ठेवता तिला दूर केलं. जग बदलतंय. परिस्थिती बदलतेय. या सगळ्यात नाती-संबधांचं स्वरूपही बदलत चाललंय. पण बदलेल्या परिस्थितीत प्रमाणीकपणा जपणही हे ही तेवढचं महत्त्वाच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.