Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार; सखल भागात साचले पाणी साचले

नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार; सखल भागात साचले पाणी साचले
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या दरम्‍यान दमदार (Rain) पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. पेरण्यांचे (Nandurbar) कामाची देखील लगबग आता सुरू आहे. (Latest Marathi News)

Nandurbar News
Navapur Car Accident : दोन कारची समोरासमोर धडक; तीन जण गंभीर, पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

नंदुरबार जिल्‍ह्यात सुरू असलेल्‍या पावसामुळे पेरण्यांना आणि भात लागवडीला वेग आला असून जिल्ह्यात जवळपास एक लाख पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर नवापूर, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांमध्ये भात लागवडीला सुरुवात झाली आहे. दमदार पावसामुळे शहरातील अनेक सकल भागात पाणी साचल्याचही समोर आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या भात लागवडीची आणि पेरणीची लगबग दिसून येत आहे.

Nandurbar News
Dhule News : मंदिरातील दानपेट्यांची चोरी; मध्यप्रदेशमधून दोघे ताब्‍यात

दुसरीकडे दमदार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले असून छोटे मोठे केटीवेअर बंधारे भरल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी होण्यासाठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात अजूनही वाढ नसल्याने चिंता कायमच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com