Cataract surgery: मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 4 रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग, दृष्टीवर परिणाम; नेमकं काय घडलं?

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांच्या डोळ्यांना त्रास होऊन त्यांची दृष्टी कमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील उपचार आणि संसर्गाच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
Cataract surgery
Cataract surgerysaam tv
Published On: 

योगेश काशिद, प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्रविभागात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांच्या डोळ्यांना त्रास होऊन त्यांची दृष्टी कमी झाल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया आणि उपचारांच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याने संसर्गाचं नेमकं कारण शोधण्यासाठी नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी तपासणीसाठी आलेल्या २२ रुग्णांवर १७ ऑक्टोबर रोजी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये लातूर जिल्ह्यातील दोन आणि अंबाजोगाईतील दोन रुग्णांचा समावेश होता. शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले.

Cataract surgery
Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांना झटका, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश

या चारही रुग्णांना जालन्यामध्ये गणपती नेत्र रुग्णालयात सहा ते सात दिवस उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणून घरी सोडण्यात आलं होतं. दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी या रुग्णांची लातूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली.

त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा तपासणीसाठी त्यांना बोलावण्यात आलं. यातील एका रुग्णाला मधुमेह तर दुसऱ्या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती नेत्रविभागप्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे यांनी दिली.

या प्रकरणाबाबत डॉ. ज्ञानोबा दराडे यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेच्या दिवशी संबंधित सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नेत्रस्वच्छता तसंच संसर्गासंदर्भातील तपासणी करण्यात आली होती. मात्र बाधित रुग्णांच्या डोळ्यांना इन्फेक्शन कसं झालंय याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करून या प्रकारामागील नेमकं कारण शोधलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Cataract surgery
Maharashtra Poltiics: निवडणूक निकालानंतर महायुतीतील तणाव वाढला, एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावत नेत्यांना दिले महत्वाचे आदेश

दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रुग्णांच्या दृष्टीवर झालेला परिणाम, त्यांच्यावर करण्यात आलेले उपचार आणि उपचारांचे अंतिम निष्कर्ष याबाबत अधिकृत माहिती समोर येणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.