

Hingoli News: राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात हिंगोली येथून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलिस निरीक्षकाचा जागीच जीव गेलाय. सदर घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊन पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे. नीळकंठ लक्ष्मण दंडगे असे या अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अपघातात दंडगे यांच्यासह इतर दोन सहकारी मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ठिकाण असलेल्या माळेगाव फाट्याजवळ धाव घेत मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेहासह ताब्यात घेण्यात आलाय. यासह जखमींना बाहेर काढत रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेले पोलीस उपनिरीक्षक निळकंठ दंडगे हे हिंगोली जिल्ह्यातील जामगव्हाण येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
रायगडाच्या पायथ्याशी महिलेचा मृतदेह
पुण्यातील वेल्हा येथे देखील एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सतीचामाळ या परिसरात हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे. महिलेच्या मृतदेहाजवळ मोबाईल,पर्स, चष्मा अशा वस्तू सापडल्या आहेत. ही घटना घात की अपघात याचा वेल्हा पोलीस तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.