Canada Bus-Truck Accident News: कॅनडातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १० प्रवाशी गंभीर जखमी झाले. कॅनडामधील मॅनिटोबा शहरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारस हा भीषण अपघात झाला. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)
अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची परिस्थिती पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मॅनिटोबाचे अधिकारी रॉब हिल यांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमधून सुमारे २५ प्रवासी प्रवास करीत होते. यामध्ये बहुतांश प्रवासी हे वयोवृद्ध होते. मॅनिटोबा (Canada News) शहरातील हायवे नंबर १ आणि हायवे नंबर ५ च्या चौकात बस आली असता, भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये १० प्रवाशांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळातच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
'मॅनिटोबातील कार्बेरीमधील घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघाताशी संबंधित लोकांच्या वेदनांची मी कल्पनाही करू शकत नाही. मात्र - कॅनडातील सर्व नागरिक तुमच्या सोबत आहेत.' अशा आशयाचं ट्विट करत जस्टिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.