Ladki Bahin Yojana: सोलापुरातील एक लाख लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही, सरकारने का घेतला निर्णय?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये महिला फक्त कोणत्याही एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतात असं नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा याबाबत स्वयंघोषणापत्र द्यावं लागणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. या योजनेत महिलांना फक्त कोणत्याही एका शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे निकष आहेत. जर तुम्ही कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तरीही या योजनेत अनेक महिला दोन योजनांचा एकत्र लाभ घेतात. त्यामुळे आता महिलांना कोणत्याही एका योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंघोषणापत्र सादर करायचे आहे. (Ladki Bahin Yojana Update)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीची टांगती तलवार; ४ हजार बहिणींनी घेतली माघार | VIDEO

महिलांना आता फक्त संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. यापैकी ज्या कोणत्या एका योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे त्याचे स्वयंघोषणापत्र सादर करायचे आहे.

संजय गांधी निराधार योजनेचे जवळपास ७४ हजार लाभार्थी आहे.दरमहा या लाभार्थ्यांना पैसे मिळतात. मात्र, या योजनेत सोलापूरमधील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना नोव्हेंबरपासून निधी मिळालेला नाही. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा निधीदेखील शासनाने दिला नाही. या योजनेत आता जर महिलांना कोणतीही एक योजना सुरु ठेवायची असेल तर घोषणापत्र द्यायचे आहे. (Ladki Bahin Yojana News)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'ला २१०० रुपये मिळणार का? मंत्र्यांच्या विधानानं 'लाडकी'चा जीव टांगणीला, VIDEO

सोलापुरमध्ये सध्या संजय गांधी निराधार योजनेचे ७३,९४८ लाभार्थी आहे. श्रावणबाळ योजनेचे १,०५,५२० लाभार्थी आहेत. एकूण १,७९,४६८ लाभार्थी आहे. त्यातील काही महिला आणि पुरुष आहेत. परंतु यातील महिलांना आता लाडकी बहीण किंवा इतर योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला नसल्याने महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला हवा, असं म्हणत असल्याचे चित्र आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : 'लाडकी'कडून 1500 वसूल करणार? लाडकींना लाभ सोडण्याचं दादांकडून आवाहन, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com