राज्यातल्या लाडक्या बहिणींना धक्का, 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र

Ladki Bahin Scheme e-KYC Deadline Impact Maharashtra: निवडणुकीत 'गेमचेंजर' ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आलीये. निवडणुकीच्या काळात ज्या लाडक्या बहिणींच्या जोरावर सत्ता मिळवली, त्याच लाडक्या बहिणींना आता सरकारनं मोठा झटका दिलाय. सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Millions of women affected as Maharashtra’s Ladki Bahin scheme removes beneficiaries after e-KYC verification drive.
Millions of women affected as Maharashtra’s Ladki Bahin scheme removes beneficiaries after e-KYC verification drive.saam tv
Published On

राज्याच्या निवडणूकांमध्ये गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेतील महिलांना मोठा धक्का बसलाय... ईकेवायसीच्या नावाखाली गाजलेल्या या योजनेला सरकारनं कात्री लावताच राज्यातील लाखो लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्यात... केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत संपल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये तब्बल ८० लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या असून त्यांचा मिळणारा लाभ आता बंद करण्यात आला आहे... यामुळे ऐन महागाईच्या काळात लाडक्या बहिणींना आर्थिक फटका बसलाय...

ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली.

मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणे किंवा नोंदी अद्ययावत न करणाऱ्या महिला योजनेतून बाद

योजनेसाठी अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे सादर करणाऱ्या महिला योजनेतून बाहेर

शासनाने निश्चित केलेले पात्रता आणि उत्पन्नाचे निकषामुळे महिला अपात्र

अर्जातील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या माहितीत तफावतीचाही फटका

अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम ३० एप्रिल रोजी अधिकृतपणे संपलीये. ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण राहिली होती, त्यांनी मुदतवाढ मिळणार नाही हे स्पष्ट झालंय. यावर विरोधकानी जोरदार टीका केलीय...तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नसल्याचं सांगत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी ही योजना महत्त्वाची ठरल्याचं म्हटलंय...

८० लाख महिलांना योजनेतून वगळणं हा आकडा थट्टा नाही. आधीच महागाईने होरपळणाऱ्या या महिलांना मिळणारी मदत ही आता काढून घेतल्यानं महिलावर्गात नाराजीये. पण वारंवार ही योजना बंद होणार नाही अशी घोषणा करणाऱ्या नेत्यांनी ईकेवायसीचं दृष्टचक्र बंद करुन गरजू महिलांपर्यंत ही योजना कशी पोहचवता येईल हे पाहणं जास्त महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com