Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

Deputy CM Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठं विधान केले. 'लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.', असे ते म्हणाले.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका
Deputy CM Eknath Shinde On Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
  • एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा

  • लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही

  • एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्र्यांसमोर मोठे विधान

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मोठा दिलासा

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले. लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ शकते असं वारंवार विरोधकांकडून बोललं जात आहे. यावरच बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की, 'कोणी कितीही आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.' एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला.

श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत उपस्थितांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांच्याबाबत मोठं विधान केले. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी बळीराजाचा आहे. शेतकरी कर्ज मुक्तीचा दुसरा हप्ता काल वर्ग केला आहे.'

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट, ४८ तासांत खात्यात जमा होणार ३००० रुपये? मोठी अपडेट समोर

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, 'आमच्या मागे ही ताकद होती म्हणून आम्ही आज सरकारमध्ये आहोत. आमचे सरकार शेतकरी, कष्टकरी यांच्या माध्यमातून काम करत आहे. शेतकरी कर्जमाफी केली. ३६५ दिवस दिवसा ८ तास वीज देत आहोत.'

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका
Ladki Bahin Yojana : सण-उत्सव गोड होणार! लाडक्या बहिणींसाठी ३००० कोटी; फडणवीस सरकारचा शासन निर्णय

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केले होते. 'जोपर्यंत राज्यात महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि महिलांना आर्थिक मदत मिळत राहील.', असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दिलासा दिला होता. तसंच, राज्यातील लाडक्या बहिणी आता जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. हे ३००० रुपये रक्षाबंधनच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com