Ladki Bahin Yojana: कुणी 'माई का लाल' पैसे वापस घेणार नाही; अजित पवार यांनी राणांना सुनावलं

Ajit Pawar Slams Mla Ravi Rana : लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना अजित पवार यांनी खडेबोल सुनावलेत.
Ladki Bahin Yojana: कुणी 'माई का लाल' पैसे वापस घेणार नाही; अजित पवार यांनी राणांना सुनावलं
Ajit Pawar Slams Mla Ravi Rana
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

'कुणी जरी माई का लाल आला तरी तुमचे पैसे वापस घेणार नाही, बोलणाऱ्याच्या हातात काय मंदिरातील घंटा आहे का? असा टोला अजित पवार यांनी रवी राणा यांना मारला. योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचं नोंदणी पत्रक देताना केलेल्या विधानामुळे आमदार रवी राणा टीकेचे धनी बनलेत. योजनेचा लाभ घ्या आणि मते द्या, अन्यथा तुमचे पैसे वापस घेऊ,असा दम त्यांनी अमरावतीमधील महिलांना दिला होता. त्यानंतर आमदार रवी राणा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावलेत. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात राणा यांनाचा समाचार घेतला होता, आता अजित पवार यांनी त्यांना खडेबोल सुनावलेत.

पुण्यातील हडपसर येथे जन सन्मान यात्रेत बोलतांना अजित पवार यांनी विरोधकांना धारेवर धरलं. विरोधक लाडकी बहीण योजनेवरून भ्रामक गोष्टी पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणलीय. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडला आहे. राज्य दिवाळखोरीत निघालं आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. विरोधकाच्या टीकेला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. आपलं राज्य आर्थिक सक्षम आहे.

लोक बोलतील दिवाळखोरी मध्ये राज्य काढल विश्वास ठेऊ नका. सरकारने लाडकी बहिण योजना बंद करावी म्हणून विरोधकांनी याचिका दाखल केली होती ती हाणून पडली. सत्तेत असताना काम करायचं नाही आणि आम्ही केलं की असे खोड घालायची हे चुकीचं आहे. विरोधकांची जनतेला काही देण्याची दानत नाही. आता विरोधकांची भाषा बदलली आहे. निवडणुकीनंतर योजना बंद पडेल, असा प्रचार विरोधकांकडून सुरू असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.

रवी राणा यांना सणसणीत टोला

अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात आमदार रवी राणा यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. या सोहळ्यात आगामी विधानसभा निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना इशारा दिला होता. 'आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपयांचे ३ हजार करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला ज्यांनी आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ ते १५०० रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं.

Ladki Bahin Yojana: कुणी 'माई का लाल' पैसे वापस घेणार नाही; अजित पवार यांनी राणांना सुनावलं
Pimpri Chinchwad News : रवी राणा यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन; लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध

त्यावरून अजित पवार यांनी राणा यांना टोला मारलाय. आमच्या महायुती मधले काही महाभाग अस सांगत आहेत की पैसे परत घेऊ मी आज् तुम्हाला शब्द देतो की कुणी जरी मयका लाल आला तरी तुमचे पैसे वापस घेणार नाही, अशी विधान कुणी करू नका. आमच्या हातात आहे. बोसलणाऱ्याच्या हातात काय मंदिरातील घंटा आहे का? चुकीला माफ करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय.

राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय ठरलीय. या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात आले आहेत. मात्र या योजनेवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. लाडकी बहीण योजना ही सरकारची फसवी योजना असून दोन महिन्यासाठीच ही योजना चालणार आहे, अशी टीका विरोध करतात. त्यात महायुतीमधील नेतेदेखील योजनेची नोंदणी करताना मतदारांना दम देत आहे. त्यावरुन विरोधकांनी सरकारच्या नेत्यांवर टीका करत आहेत.

Ladki Bahin Yojana: कुणी 'माई का लाल' पैसे वापस घेणार नाही; अजित पवार यांनी राणांना सुनावलं
Ladki Bahin Yojana: संविधान धोक्यात येतंय; लाडकी बहीण योजनेच्या विधानावरुन बच्चू कडू यांचा रवी राणा यांच्यावर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com