Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे २ आमदार शिंदे गटाच्या गळाला?

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे २ आमदार शिंदे गटाच्या गळाला?
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

सुनील काळे, मुंबई

विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhan Sabha Election 2024) राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, पदाधिकारी आणि आमदारांच्या पक्षांतरांना वेग आला आहे. अशामध्ये शिवसेना शिंदे गट काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे.

काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन्ही आमदार लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

मंगळवारी रात्री उशिरा या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. लवकरच ते काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत.

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे २ आमदार शिंदे गटाच्या गळाला?
Maharashtra Politics: नगराध्यक्षाचा कार्यकाळ होणार डबल; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे विधानपरिषदेतील काँग्रेसचे आमदार आहे. हिरामण खोसकर हे इगतपुरीचे आमदार आहेत. तर जितेश अंतापूरकर हे नांदेडच्या देगलूरचे आमदार आहेत. विधानपरिषद निवडणुकीमध्ये या दोन्ही आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते.

त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही आमदारांवर कारवाई होणार आहे. या कारवाईपूर्वीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकरांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे लवकरच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार मोठा राजकीय भूकंप, काँग्रेसचे २ आमदार शिंदे गटाच्या गळाला?
Maharashtra Politics : सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com