
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. नियमांत बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याने हे अर्ज बाद करण्यात आले आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः एक्स अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. पाच लाख महिलांचे अर्ज आतापार्यंत बाद करण्यात आले आहे.
ज्या महिला नियमांत बसत नसतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. दरम्यान, ज्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे त्यांच्याकडून सर्व महिन्यांचे हप्ते परत घेतली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना जानेवारीपासून हप्ता देणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, मागील ६ महिन्यांचे पैसे परत घेणार का असा प्रश्न महिलांना पडलेला होता. तर लाडकी बहीण योजनेत यापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम परत घेणार नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे. (Ladki Bahin Yojana)
आतापर्यंत लाभ घेतलेल्या महिलांकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाही. परंतु अपात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यापासून पैसे जमा करण्यात येणार नाही, असं महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. या योजनेत आतापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या २,३०,००० महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.
६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १,१०,००० महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.
चारचाकी वाहने, नमोशक्ती योजनेचा लाभ घेत असलेल्या आणि स्वच्छेने नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिलांचे अर्ज बाद केले आहे.
आतापर्यंत ५००००० महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी अजून सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.