सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या बाबा सोशल मिडियावर जोरदार ट्रेडिंगवर आहेत. लड्डू मुत्या बाबाच्या कथित चमत्कारिक कृत्याची नेटकऱ्यामध्ये जोरदार चर्चा होत आहे. पंख्याला हात लावून आशीर्वाद देत असल्याने लड्डू मुत्या बाबाला 'फॅन बाबा' म्हणून देखील ओळखलं जात आहे. हाच लड्डू मुत्या बाबा अडचणीत सापडला आहे. लड्डू बाबाच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने मागणी केली आहे.
लड्डू मुत्या बाबा हा कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील आहे. लड्डू मुत्या बाबा हा प्रवचन देण्यात माहीर आहे. चालू पंखा थांबवून आशीर्वाद दिल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लाडू मुत्या बाबा याचे हजारो भक्त आहेत. कर्नाटकात हात प्रसिद्ध असलेला लड्डू मुत्या बाबा अडचणीत सापडला आहे.
कर्नाटकातील लड्डू मुत्या बाबावर कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. लोकांना फसवण्याचे काम लड्डू मुत्या बाबा करत आहे. हाताने पंखा बंद करणे त्यामुळे आजार बरे होतील, अशी अंधश्रद्धा बाबा पसरवत आहे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला आहे.
या लड्डू मुत्या बाबावर कारवाई करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख म्हणाले, 'कर्नाटकातील लड्डू मुत्या बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात काही लोक त्या बाबाला उचलून घेत आहेत. त्यानंतर तो बाबा हाताने पंखा थांबवतो. त्यानंतर पंख्याला लागलेली धूळ लोकांच्या कपाळाला लावतो. तो चमत्कार लोकांना वाटत आहे. याआधी बागलकोटमध्ये हाताच्या बोटाने ऑपरेशन करणारा बाबा आला होता. त्याच्या भक्तात मोठी वाढ झाली होती. हाताच्या बोटाने ऑपरेशन करता येतात, असं तेथील लोकांना वाटू लागलं होतं.
'आज देखील पंखा हाताने थांबवणं चमत्कार वाटत आहे. या बाबाच्या आशीर्वादाने आजार बरे होतात, असे लोकांना वाटत आहे. त्यामुळे लोक त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती अशा गोष्टीचा नेहमी विरोध करते. चमात्काराचा कोणी करत असेल तर कर्नाटकातही जादू टोणाविरोधी कायदा आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.