Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्रासाठी मोठं पाऊल; 10 ते 17 सप्टेंबरपर्यंत मंडळ स्तरावर विशेष शिबिरे

kunbi certificate: special camps from september 10 to 17 : कुणबी प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्तांकडून यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
कुणबी प्रमाणपत्रासाठी 10 ते 17 सप्टेंबरपर्यंत मंडळ स्तरावर विशेष शिबिरे
Kunbi Certificate Special Campssaam TV
Published On

Kunbi Maratha caste certificate special camps district wise : मराठा आणि कुणबी समाजाच्या जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरांमध्ये कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा पात्र नागरिकांच्या जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्राशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान ठेवण्यासोबतच अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलदगतीने करण्याचे निर्देश आहेत.

प्रत्येक शिबिराची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबत ग्रामपंचायत, नोटीस बोर्ड आणि स्थानिक माध्यमांतून प्रसिद्धी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच शिबिरातील दैनंदिन कामकाजाचा अहवाल नोडल अधिकाऱ्यामार्फत विभागीय कार्यालयाकडे सादर करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ही मोहीम सर्वोच्च प्राधान्याने राबवून आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

कुणबी प्रमाणपत्रासाठी 10 ते 17 सप्टेंबरपर्यंत मंडळ स्तरावर विशेष शिबिरे
Maratha Reservation:'मसुद्यावर भूमिका स्पष्ट करा, मगच पुढचा निर्णय'; सरकारचा जरांगेंना अल्टिमेटम

नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित

  • जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही अशा प्रकरणांत अडीअडचणींचे निरसण करणे, प्रक्रिया गतिमान आणि पारदर्शक करणे

  • जात प्रमाणपत्र आणि पडताळणी संदर्भातील सर्व तक्रारींचा दररोज आढावा घेणे

  • तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात पडताळणी समिती यांच्यात समन्वय

  • प्रलंबित प्रकरणांचा अहवाल दर सोमवारी या कार्यालयांना सादर करणे

  • जिल्ह्यातील कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगानं आवश्यक कार्यवाही जलदगतीनं होण्यासाठी मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करणे.

कुणबी प्रमाणपत्रासाठी 10 ते 17 सप्टेंबरपर्यंत मंडळ स्तरावर विशेष शिबिरे
Maratha bandh : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! बीडसह उद्या ४ जिल्हे कडकडीत बंद; काय सुरू आणि काय बंद? पाहा संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com