Kunal Kamra Controversy : कुणाल कामराचं गाणं, शिंदेसेनेला झोंबलं; फोडला कामराचा स्टुडिओ, Video व्हायरल

Kunal Kamra Eknath Shinde : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं गायलेलं गाणं शिंदे सेनेला चांगलंच झोंबलंय... इतकं झोबलं की स्टूडिओ फोडला, कुणाल कामराला धमकावलं.. मात्र कुणालनं गायलेलं गाणं काय आहे? त्याचे विधीमंडळात कसे आणि का पडसाद उमटलेत? पाहूयात...
Kunal Kamra Eknath Shinde
Kunal Kamra Eknath Shinde Saam Tv
Published On

कुणाल कामराचं हे गाणं शिंदे गटाला चांगलच झोंबलंय..त्यामुळे शिंदे गटाने कुणाल कामराचा स्टुडिओ फोडलाय.. तर खार पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केलाय..साहजिकच कामराच्या वक्तव्याचे विधीमंडळातही पडसाद उमटलेत....उध्दव ठाकरे आणि विरोधकांनी मात्र कुणाल कामराची पाठराखण केलीय...

Kunal Kamra Eknath Shinde
Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? औरंगजेबाच्या कबरीनंतर वाघ्याची समाधी वादात, नेमकं प्रकरण काय?

आता कुणाल कामराविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान त्याचे सीडीआर तपासण्यात येणार आहेत.. फडणवीसांनीही कुणाला इशारा दिलाय. या वादात हे मात्र स्पष्ट आहे की राजकारण्याना विडंबनाचं वावड असतं... जिव्हारी लागलेल्या टीकेला ते हतोड्यानं उत्तर देतात... सत्तेत असून कायदा हातात घेतात.. एक मात्र लक्षात ठेवायला हवं विदूषक आणि राजाच्या लढाईत नेहमी विदूषकचं जिंकत आलाय..

Kunal Kamra Eknath Shinde
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं बुलडोझर सरकार! युपीचा बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात, दंगलखोरांच्या घरांवर जेसीबीची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com